अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर शिवभोजन मोहीमेचा शुभारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०५/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे अक्षय तृतीया व रमजान ईद या सणाच्या दिवसाचा शुभमुहूर्त साधत हीं शिवसेना शाखेच्या वतीने वाचनालय चौकात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र शासनच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत ५० आमरस, पुरी थाळींचे वाटप करून शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग, व्यवसाय बंद असल्याने तसेच मजूर वर्गाला हाताला काम नसल्याने गोरगरिबांची जेवणाची परवड होऊनये म्हणून मोठ्या व बाजारपेठ असलेल्या गावात महाराष्ट्र शासनाने शिवभोजन थाळी ही योजना आमलात आणून या गोरगरिबांना योजनेचा जास्तीत लाभ देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
हाच हेतू डोळ्यासमोर ठेवत शेंदुर्णी येथे आज दिनांक १४ मे शुक्रवारी कार्यक्रमाचे अध्यक्ष गायक मा.श्री. पी.गणेश यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री. संजय दादा गरुड,पाचोरा विघ्नहर्ता हॉस्पिटले संचालक डॉ. मा.श्री. सागर गरुड,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.श्री. डॉ. मनोहर पाटील, युवासेना जिल्हाधिकारी भरत पवार यांच्या शुभहस्ते आमरस, पुरी ५० थाळ्यांचे वाटप करुन शुभारंभ करण्यात आला.
या शिवभोजन थाळी योजनेचा लाभ वाचनालय चौक व सरकारी दवाखाना या दोन ठिकाणी मिळणार आहे.
(मा.श्री. संजयदादा गरुड.)
शेंदुर्णी नगरीत शिवभोजन थाळीचा शुभारंभ करतांना मला खुप आनंद होत आहे. कारण अन्नदान करण्यासारखे पुण्य दुसरे कोणतेही नाही. तसेच या योजनेसाठी निधीची चिंता करु नका मी स्वताहा या योजनेकडे लक्ष ठेवून निधी कमी पडू देणार नाही.अशी ग्वाही दिली. फक्त आयोजक व कार्यकर्त्यांनी या अन्नदानासारख्या महान कार्यात झोकून देत परिश्रम घेऊन ही योजना सतत सुरु ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
(मा.श्री.सुनील गुजर.)
आपल्या शेंदुर्णी नगरीतील तसच पंचक्रोशीतील ज्या तरुणांचे येत्या काळात वाढदिवस येतील त्या तरुणांनी आपला वाढदिवस पाश्चात्य संस्कृती म्हणजे केक वैगेरे कापून साजरा न करता वाढदिवसाच्या निमित्ताने या शिवभोजन केंद्रावर अन्नदान करुन करावा व गोरगरीब जनतेचे आशिर्वाद घ्यावेत असे आवाहन सुनील गुजर यांनी केले.
याच कार्यक्रमात ज्यांनी कोरोनासारख्या भयंकर आजाराच्या कालावधी रुग्णांची निस्वार्थ सेवा केली असे मा.श्री. विजय निकम यांचा कोरोना योध्दा म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या शिवभोजन थाळी योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना शहर प्रमुख मा.श्री. संजय सुर्यवंशी, मा.श्री. भुषण बडगुजर,मा.श्री. अशोक बारी,मा.श्री. सुदर्शन पाटील, मा.श्री.बारकु पाटील, मा.श्री.सोनू नरपगारे,मा.श्री.धनंजय गरुड, मा.श्री. रोहित पवार,विचार मंचाचे अध्यक्ष मा.श्री. रवींद्र गुजर व ईतर कार्यकर्ते सोशल डिस्टंसिगचे नियम पाळत उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.डॉ. सुनील अग्रवाल यांनी तसेच सुत्रसंचालन अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले मा.श्री.सुनील गुजर व आभारप्रदर्शन मा.श्री.अजय भोई यांनी केले.