जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०४/२०२३
जळगाव जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतीमधील एकुण ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून या निवडणुकीबाबत दिनांक १८ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी दिनांक २५ एप्रिल २०२३ मंगळवार पासून ते ०२ मे २०२३ मंगळवार दरम्यान अर्ज विक्री व स्वीकृती केली जाणार असून ०३ हे २०२३ बुधवार रोजी छाननी तर ०८ मे २०२३ सोमवार पर्यंत माघार घेता येणार आहे. तसेच दिनांक १८ मे २०२३ गुरुवार रोजी मतदान घेण्यात येणार असून १९ मे २०२३ शुक्रवार रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेचा समावेश करण्यासाठी दिनांक १७ एप्रिल २०२३ सोमवार रोजी महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, ग्रामपंचायत विभागाच्या नायब तहसीलदार दिपाली काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना आयुक्तांसमोर सादर केल्या तत्पूर्वी ३४ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत आलेल्या हरकतींवर संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या निवाड्याची माहिती देत त्यानुसार जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी नवीन प्रभाग रचनेला मंजूरी दिली असून दिनांक २५ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी या नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतीमधील ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असल्याने या कडकडी उन्हाळ्यात घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणूकीच्या वादळात उमेदवारांकडून मतदारांना आश्वासनाच्या पावसासोबत हातमिळवणीचा गारवा मिळणार हे मात्र निश्चित.