दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीजवळ कोणतंही पद किंवा सत्ता नसतांना स्वताला सतत जनसेवेत झोकून दिले आहे. आपल्या मतदारसंघात आपला, परका असा भेदभाव न करता सर्वांच्या सुखदुःखात धाऊन जाऊन स्वताची पदरमोड करुन समोच्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हटले म्हणजे वरखेडी येथील रहिवासी मा. श्री. अमोल भाऊ यांचे खंदे समर्थक माजी पंचायत समितीचे सदस्य मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार.

ज्ञानेश्वर भाऊ सोणार हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती परंतु आधीपासूनच त्यांना समाजसेवा करण्यासाठी छंद आजही ज्ञानेश्वर भाऊ सोनार हे गावागावांतील तरुणांच्या संपर्कात असून गावागावातून होणारे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, गणेशोत्सव, नवरात्र व विविध कार्यक्रामात सहभागी होऊन त्यांना आर्थिक मदत करत असतात. गोरगरिबांच्या उपचारासाठीचा डॉक्टर मंडळीशी संपर्कात राहून कमीतकमी खर्चात ऑपरेशन, उपचार करुन देण्यासाठी प्रयत्न करतात. गावागावात जाऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोणालाही मदत देणे, मदत करणे, संकटात धाऊन जाणे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन नवतरुणांना योग्य मार्गदर्शन करणे हे उपक्रम राबवत असतांना कोणतीही प्रसिध्दी न करता फक्त आणि फक्त समाजहीतासाठी झटणारे पंचक्रोशीतील गावागावातून ओळखले जाणारे व्यक्तीमत्व म्हणजे मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार वरखेडी यांचेच नाव घेतले जाते. आज त्यांनी सत्यजितच्या माध्यमातून तमाम नागरिकांना व भगिनींना दिवाळीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.