दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२२

पाचोरा पंचायत समितीच्या कार्यालयात तालुक्यातील बरेचसे गरजु लोक जन्म दाखला, मृत्यू दाखला घेण्यासाठी जातात तेथे गेल्यानंतर गरजूंना रितसर अर्ज लिहून आणण्यासाठी सांगितले जाते त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला मिळण्यासाठी तिकीट लाऊन अर्ज दिला जातो हा दाखला मागणीसाठी दिलेला अर्ज संबंधित कर्मचारी स्विकारुन घेतात मात्र अर्ज स्विकारल्यानंतर अर्जदाराच्या अपेक्षेप्रमाणे वेळवर दाखले दिले जात नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता जन्माचे व मृत्यूचे दाखले मिळवून घेण्यासाठी गरजूंना पंचायत समितीचे कार्यालयात सतत चक्करा माराव्या लागतात विशेष म्हणजे पंचायत समितीचे कार्यालय व हे दाखले देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालयात दुसरीकडे व्यवस्था करण्यात आली असल्याने गरजवंताला दोघ कार्यालयात खेटे मारावे लागतात.

गरजवंताला अक्कल थोडी या म्हणीप्रमाणे दाखले मिळवून घेण्यासाठी गरवंत कार्यालयाबाहेर तासंतास उभे रहातात मात्र संबंधित विभागातील गोपाल नावाची जबाबदार व्यक्ती वेळेवर दाखले देण्या ऐवजी गोलमाल करत बसते अश्या तक्रारी ऐकायला येत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार येथेच थांबत नसून हे दाखले मिळवून घेण्यासाठी कागदावर वजन ठेवले तरच कागद ठिकाणावर सापडतात व काम वेळेवर होते नाहीतर कागद हातोहात उडून जातात व वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्याचे अनुभव अनेकांनी सांगितले आहेत.

सद्यस्थितीत आधार कार्ड काढणे, जन्म तारखेत बदल करणे, दुरुस्ती करणे तसेच शालेय कामकाजासहीत विविध कामांसाठी जन्माचा दाखला व वासर लावणे, वारस काढणे, कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी मृत्यू दाखला घेणे अत्यंत गरजेचे असल्यावर ही फक्त आणि फक्त या विभागातील गोपाल नावाच्या कर्मचाऱ्याच्या मनमानीमुळे जनता हैराण झाली आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी दिनांक ०७ डिसेंबर २०२२ बुधवार पासून रजेवर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संबंधित कर्मचारी हा सोमवारी कामावर हजर झाल्यानंतर या असे सांगितले जात आहे.

तरी गटविकास अधिकारी यांनी संबंधित विभागाकडे लक्ष देऊन या विभागातील मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी केली जात आहे.