पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ मार्च पर्यंत कडकडीत बंद. मात्र देशी दारुचे दुकान सुरु असल्याने सुज्ञ नागरिक व महिला संतप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे जवळपास पंचवीस हजार लोकवस्तीचे गाव असून मोठी बाजारपेठ आहे. तसेच पिंपळगाव हरेश्वर येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. या बाजारात जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्यातील व्यवसाईक मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय करण्यासाठी येतात. तसेच आसपासच्या विस गावातील शेतकरी, हात मजूर संसारपयोगी वस्तू कपडेलत्ते घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात याची दखल घेत महाराष्ट्रात तसेच जळगाव जिल्ह्यात व जिल्ह्यातील गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याचे लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार वाढुनये म्हणून तातडीचा उपाय म्हणून सामाजिक अंतर राखत मानवी साखळी खंडित करण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, तसेच सुज्ञ नागरिक व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांच्या निगराणीत कडकडीत जनता कर्फू पाळण्यात आला.
मात्र दुसरीकडे देशी दारूचे दुकान सताड उघडे असल्याने या ठिकाणी व परिसरात आसपासच्या गावासह पिंपळगाव हरेश्वर येथील तळीरामांची मोठी यात्रा भरली असल्याचे दिसत होते याबाबत देशी दारु दुकानाच्या मालकांना भ्रमणध्वनीवर विचारले असता जिल्हाधिकारी यांचे आदेश नसल्यामुळे मी दुकान बंद करणार नाही. असे सांगितले.
याबाबत पिंपळगाव हरेश्वर येथील सूज्ञ नागरिक व महिलांनी नाराजी व्यक्त. केली आहे. कारण दुध डेअरी, दवाखाने, औषधालय वगळता दिनचर्येत अत्यावश्यक असलेले सर्व जिवनावश्याक व्यवहार बंद ठेवत पिंपळगाव हरेश्वर येथील व्यवसाईकांनी व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळुन जनताकर्फूला प्रतिसाद दिला मात्र ज्या दारूमुळे शासनाला महसूल मिळत असला तरी हजारो संसार उघड्यावर येत असतांना सुध्दा निदान कोरोना सारख्या भयंकर आजाराची लागण थांबवण्यासाठी देशी दारु विक्रेत्याने सहकार्य करणे अपेक्षित असतांनाच त्यांनी असहकार दाखवत जनताकर्फूला खो दिल्याने. नाराजी व्यक्त केली जात आहे.
कारण मागील आठवड्यात पाचोरा शहरात जनताकर्फू पाळण्यात आला तेव्हा पाचोरा शहरातील देशी दारु, बिअर बार, वाईन शॉप, ताडी विक्रीची दुकाने बद ठेवण्यात आली होती. व दिनांक २४ मार्च पासून वरखेडी येथे जनताकर्फू जाहीर करण्यात आला आहे. याठिकाणी देशी दारु दुकान संबंधित मालकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत जनताकर्फूत सहभाग नोंदवला आहे.