रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांची पाचोरा, भडगाव रोटरी क्लबला सदिच्छा भेट.
प्रा. शिवाजी शिंदे.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२४
रोटरी प्रांत ३०३० च्या प्रांतपाल (District Governor) आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ मार्च सोमवार रोजी पाचोरा व भडगाव येथील रोटरी क्लबला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी रोटरी क्लबच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेतला कामकाज पाहून त्यांनी रोटरी क्लबच्या सदस्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले.
रोटरी क्लबच्या प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी दिनांक १८ मार्च सोमवार रोजी महाराष्ट्रातील प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथील हेमाडपंथी स्वयंभू श्री. हरिहरेश्वर मंदिराला भेट देऊन मनोभावे पूजा, अर्चना केली. नंतर मतिमंद निवासी विद्यालयाला भेट देऊन विद्यालयातील सोयी, सुविधांबाबत माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांशी हितगुज केली. तदनंतर पाचोरा येथील स्वप्न शिल्प रेसिडेन्सी बॅक्वेट हॉलमध्ये रोटरी क्लबच्या सदस्यांच्या बैठकीला उपस्थित दिली.
या बैठकीत रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. मुकेश तेली यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा सादर केला. पाचोरा, भडगाव रोटरी क्लबचा सण २०२३ ते २०२४ या कालावधीत झालेल्या कामाचा आढावा व उपक्रमांची माहिती जाणून घेत केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच क्लबचे अध्यक्ष डॉ. मा. श्री. पंकज शिंदे, सेक्रेटरी डॉ. मा. श्री. मुकेश तेली व मंचावर असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत आशा वेणुगोपाल यांनी रोटरी क्लबचे सण २०२४, २०२५ या वर्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मा. श्री. पवनसिंग पाटील, नवनिर्वाचित सेक्रेटरी प्रा. मा. श्री. शिवाजी शिंदे यांना सन्मानित केले. तसेच रोटरी क्लबचे जेष्ठ सदस्य मा. श्री. भरत सिनकर यांनी रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत “पॉल हॅरिश सदस्य” म्हणून देणगी दिल्याबद्दल प्रांतपाल यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
या बैठकीत क्लबचे अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी चंद्रकांत शेठ लोढाया, भरत सिनकर, गोरख महाजन, रुपेश शिंदे, राजेश मोर, निलेश कोटेचा, सुयोग जैन यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी रोहन पाटील, सौ. ज्योती शिंदे, सौ. चारुशीला तेली, डॉ. प्रतिभा तेली, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. घनश्याम चौधरी, रो. डॉ. किशोर पाटील उपस्थित होते.शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुयोग जैन यांनी आभार प्रकटन केले.