कुऱ्हाड येथील नामांकित पहिलवान अनिल चौधरी यांचा अपघाती मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०२/२०२०
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी, नामांकित पहिलवान, व गुरांचे व्यापारी श्री. अनिल शांताराम चौधरी वय ४६ हे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लोहारा गावाकडून कुऱ्हाड गावी घराकडे येत असतांना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुऱ्हाड तांड्या जवळील भिका भाऊ गणपत यांच्या शेताजवळ वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु जागेवर अनिल चौधरी यांची प्राणज्योत मालवली असल्याने काहीच उपचार करता आले नाहीत. त्यांच्या या अपघाती मृत्यूची बातमी कुर्हाड खुर्द, कुराड बुद्रुक तसेच पंचक्रोशीत माहित पडतात त्यांच्या मित्रमंडळींनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या या अचानक जाण्याने गावात व पंचक्रोशीतील गावागावात हळहळ व्यक्त केली जात असून स्मशान शांतता पसरली आहे.
स्व.अनिल चौधरी यांना बालपणापासूनच कुस्त्या खेळण्याची आवड होती. बालपणापासून शेवाच्या पुडीवर कुस्ती खेळत, खेळत अनिल चौधरींनी जळगाव, धुळे जिल्ह्यासह मराठवाड्यात कुस्तींचा आखाडा गाजवून कुऱ्हाड गावाची शान वाढवली होती. कुस्ती खेळणे तसेच घोडेस्वारी करणे हा त्यांचा छंद होता. सोबतच आपला व्यवसाय सांभाळून समाजसेवा करण्यासाठी ते कुठेही पुढे असत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.श्री. अरुण पाटील यांचे ते चांगले मित्र होते. यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी बरेच वर्षे शिवसेना पक्षाचे काम केले. अनिल चौधरींनी आखाडा गाजवत असल्याने स्व. आर ओ. पाटील. यांची कौतुकाची थाप कायमस्वरूपी यांच्या पाठीवर असायची.
मागील वर्षीच त्यांच्या मोठ्या भावाचे दुर्देवी निधन झाले होते, आणि आज या घटनेने पुन्हा त्यांच्या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पाच्यात लहान बंधू सोनू चौधरी, आई,पत्नी ,मुली मुलगा असा मोठा परिवार असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली.