ग्रामविकास मंत्री यांच्या प्रेरणेने “लोहारा येथिल दिव्यांगांची दिवाळी आनंदात”

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२२

दिवाळीच्या सणानिमित्त सगळीकडे धामधूम व गोडधोड पक्वानांची मेजवानी सुरु असतांनाच आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो अशी भावना मनाशी बाळगून लोहारा येथील दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून लोहारा येथील मा. श्री. कैलास आप्पा चौधरी व लोहारा भाजपा शाखेतर्फे लोहारा येथील दिव्यांग बांधवांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये रोख रकमेचे वाटप करण्यात आले.

(ग्रामपंचायत सरपंचाची मनमानी, दिव्यांगाची परिस्थिती केविलवाणी)
असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा दिव्यागांच्या गरजा लक्षात घेऊन त्याकरिता खर्च करायचा असतो. परंतु लोहारा ग्रामपंचायतीने मागील बऱ्याच दिवसांपासून दिव्यांगांसाठी कोणत्याही निधी खर्च केल्या नसल्याचे तक्रारी समोर येत आहेत. तसेच लोहारा ग्रामपंचायतीने आता एन दिपवाळीच्या वेळेस दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीतून अपंगांचा कोणताही विचार विनिमय न करता स्वमर्जीने घरातील हवेच्या पंचांची खरेदी करून हे पंखे वाटप दिव्यांगांना करण्यासाठी आणले होते. परंतु काही दिव्यांग बांधवांच्या घरी अगोदरच पंखे असल्याकारणाने व काही दिव्यांग बांधवांच्या घरी विद्युत पुरवठा नसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीने देऊ केलेले पंखे घेण्यासाठी नकार दिला असून आपण दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च केला असल्याचे दाखवण्यासाठी ग्रामपंचायतीने लोहारा गावातील काही दिव्यांगाना जवळ करत त्यांना पंखे दिले आहेत. ज्यांना पंखे दिले आहेत त्यापैकी काही दिव्यांग बांधवांजवळ दिव्यांगाचे प्रमाणपत्र नसल्याचे बोलले जात असून प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांगांना गरज नसतांना पंखे घेणे योग्य वाटत नसल्याने त्यांनी पंखे घेण्यासाठी नकार दिला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत दिव्यांगांना ग्रामपंचायतीने रोख रकमेच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांची घालमेल पाहून लोहारा येथील समाजसेवक भाजपचे सदस्य व माजी उपसरपंच मा. श्री. कैलास आप्पा चौधरी यांनी ही बाब ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या लक्षात आणून देत त्यांच्या प्रेरणेतून दिव्यांगांची दिवाळी गोड करण्याचे ठरविले.

व दिनांक २६ ऑक्टोंबर २०२२ बुधवार रोजी लोहारा येथील माळी समाज मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांना बोलावून घेत पदरमोड करुन स्वखर्चाने प्रत्येकी एक हजार रुपये रोख स्वरुपात देऊन एकूण ७८ दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड केली. दिव्यांग बांधवांच्या हातात प्रत्येकी एक हजार रुपये मिळताच त्यांच्या चेहेऱ्यावरील आनंद पाहून आयोजकांना खुपच आनंद झाला व समाधान वाटले.

या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते मा. श्री. शरद आण्णा सोनार, मा. श्री. कृष्णा भिवसने, मा. श्री. सुनील देशमुख, मा. श्री. भास्कर भोई, मा. श्री. अतुल कोळी, मा. श्री. रुपेश धनगर, मा. श्री. अनिल तडवी, मा. श्री. नंदू सुर्वे, जेष्ठ पत्रकार मा. श्री. रमेश शेळके, मा. श्री. चंद्रकांत पाटील, एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश पाटील, सचिव मा. श्री. विजय जाधव, खजिनदार मा. श्री. कांतीलाल राजपूत, मा. श्री. विकास भोई, मा. श्री. अनिल चौधरी, अहमदखान भिकनखान, मा. श्री. बाळू जाधव, मा. श्री. विठ्ठल धनगर, या. श्री. अनिल राजपुत यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या