वाकोद येथून घरातून निघून गेली आहे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२२
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील एक महिला घरात कुणाला काही न सांगता निघून गेली असून फोटोतील महिला कुठे आढळून आल्यास पहूर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पहूर पोलीसांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर येथून जवळच असलेल्या वाकोद येथील सुनीता राजु मोरे वय वर्षे (४२) ही महिला दिनांक २६ ऑक्टोंबर २०२२ बुधवार रोजी घरात कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेली आहे. सुनीता घरातून अचानकपणे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर तीच्या कुटुंबीयांनी सर्वदूर शोधाशोध केली मात्र सुनीता कुठेही आढळुन न आल्यामुळे तीचा मुलगा आकाश राजु मोरे याने दिनांक २७ ऑक्टोंबर २०२२ गुरुवार रोजी पहूर पोलीस स्टेशनला येऊन त्याची आई सुनीता मोरे हि घरात कुणालाही काही न सांगता निघून गेली असल्याची खबर दिली असून या खबरीवरुन पहूर पोलीस स्टेशनला मिसींग (हरवल्याची) नोंद करण्यात आली आहे.
हरवलेल्या महिलेची उंची अंदाजे पाच फूट दोन इंच, शरीरयष्टी जाड, नाक सरळ, डोळे मध्यम काळसर, केस काळे व लांब, चेहेरा गोल, आकाशी रंगाची अंगावर पैठणी साडी, पायात काळ्या रंगाची चप्पल घातली असून अश्या वर्णनाची महिला कुणाला, कुठेही आढळून आल्यास ८३०८८०५२०१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पहूर पोलीसांनी केले आहे.