अंबे वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत मनोहर शळके यांची तक्रार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२३
पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांच्या बाबतीत तक्रारी वाढत असून काही रेशनिंग दुकानावर ग्राहकांना हस्तलिखित पावती देऊन शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पुरेपूर धान्य वाटप करत नसल्याने रेशनकार्ड धारकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असाच काहीसा प्रकार अंबे वडगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून सुरु असल्याची तक्रार मनोहर महारु शळके यांनी केली आहे.
मात्र या तक्रारीबाबत रेशनिंग दुकानाचे सेल्समन मानिक पाटील यांनी मनोहर शळके यांनी केलेल्या तक्रारीचे खंडण केले असून तांत्रिक अडचणी आल्यामुळे मशिन बंद आहे. व गुढीपाडव्याच्या सणानिमित्त धान्य वाटप करणे गरजेचे असून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दरडोई पुरेपूर धान्य वाटप करत असल्याचे सांगितले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.