वेळ पडल्यास मतदार संघातील जनतेच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरेल मा. आ. दिलीप ओंकार वाघ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२२
भडगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंवाद यात्रा सुरू असून या यात्रेस खेड्यापाड्यातील जनतेओ प्रचंड उत्साह दिसून येत असून प्रोत्साहन मिळत आहे. गावागावांतील नागरिक, भगिनी व गावकरी हे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्यासमोर आपापल्या तसेच गावातील समस्या हक्काने मांडत आहेत. मात्र गाऱ्हाणे मांडतांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हुकुमशाही कारभाराबाबत तिव्र संताप व्यक्त करत आहेत.
समस्या ऐकून घेत समस्या सोडविण्यासाठी थेट संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व ज्या समस्या सोडविण्यासाठी कागदपत्रे व इतर पुर्तता करायची आहे अश्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असुन लवकरात, लवकर समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावकऱ्यांना आश्वासन देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने काल पेंडगाव, शिंदी, कोळगाव, पिंप्रीहाट या गावांना भेटी देऊन पदाधिकारी, ग्रामस्थ, महिलावर्ग व सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला असता स्वस्त धान्य दुकानदार यांची मनमानी, शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य न मिळणे, धान्य घेतल्यावर पावती न देणे, विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, अती पावसामुळे शेतातील विहीर तुडुंब भरल्यामुळे त्यातील पाणी उपसा करण्यासाठी विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेत पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्ररी, पीक पेरा लावणे, पीक विमा, केवायसी करणे, आधारकार्ड व मतदान कार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सुविधा केंद्रावर होणारी आर्थिक लुट तसेच नेटवर्कर मिळत नसल्याने सर्व्हर डाऊन असणे यामुळे वेळेच्या आत कामकाज होत नसल्याचे सांगित या कामासाठी होणारा आर्थिक खर्च व वाया जाणारा वेळ याबद्दल तक्रार केली तसेच शेत रस्ते, नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे पंचनाम्यात होणारी दिरंगाई याबाबत सविस्तर माहिती देत तक्रारी मांडल्या.
या दोऱ्या दरम्यान विषेश म्हणजे आम्ही सत्ताधारी आमदारांना शेत रस्ता बनवून द्या अशी मागणी केली असता माला यापुढे मतदान नाही केले तरी चालेल पण मी रस्ता बनवून देऊ शकत नाही असे उत्तर मिळते असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले अशीही माहिती समोर येताच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला.
माजी आमदार दिलीप भाऊ वाघ ~
आत्ताचं भाजपा व बंडखोर शिवसेनेचे सरकार म्हणजे पन्नास खोके, एकदम ओके असा कारभार सुरू असून दुनिया जाय बाड मे, हमे क्या पडी अश्या पध्दतीने वागत असून एका बाजूला सर्वसामान्य जनता व जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अडचणींचा सामना करत असतांनाच भाजपाने खोके देऊन सरकार पाडले व सेनेच्या मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व विश्वास घात करुन असुरी आनंद लुटत आहेत अशी घणाघाती टीका करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे बोलतांना माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी टीका करतांना सांगितले की आघाडी सरकार पाडून भाजपा वाल्यांनी एक रिक्षावाला तर दुसऱ्या पानटपरी वाल्यांच्या हातात सत्ता देउन कृषी खात्याचा कोणताही अनुभव नसतांना अब्दुल सत्तार यांना कृषी खाते देऊन शेतकऱ्यांना हितासाठी सबसिडी न देता शेतकऱ्यांच्या खतावर जी. एस. टी. एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कृषी खात्याचे मोठे नुकसान केले केले आहे.
यामागील कारण म्हणजे भाजपा व बंडखोर शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेत अनुभवहीन मंत्री पहावयास मिळत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज विविध समस्यांच्या विळख्यात सापडली असतांनाच हे सरकार मनमानी कारभार करत असल्याने मी माझ्या मतदारसंघातील जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही असे सांगितले. या समस्या सोडविण्यासाठी मी व माझ्या पक्षाचे पदाधिकारी मिळून राज्याचे विरोधीपक्षनेते मा. श्री. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी सरकारला धारेवर धरणार आहोत असे सांगित संपूर्ण मतदारसंघातून ही जनसंवाद यात्रा सुरुच असल्याचे सांगितले.