बेपत्ता ऊसतोड मजुर घरी न परतल्याने हतबल झालेल्या मजुराच्या पत्नीचा मुकादमावर संशय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील एका तांड्यातील एका हात मजुराला गावातीलच एका ऊसतोड मजुर मुकादमाने जानेवारी २०२२ मध्ये आपल्यासोबत ऊसतोडीसाठी कामावर घेऊन गेला होता. त्यानंतर ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेलेले उसतोडी करणारे सगळे मजुर जुन महिन्यात परत आले.
परंतु सगळ्या मजुरांपैकी एक साठ वर्षाचा मजूर परत न आल्यामुळे संबंधित मजुराच्या पत्नीने मुकादमाकडे विचारणा केली असता तुझा पती नंतर येईल तु चिंता करू नको असे सांगत, सांगत आज ऑक्टोंबर महिना उलटला तरीही संबंधित मुकादमाने नेलेला मजूर घरी न आल्यामुळे मजुराच्या पत्नीचा संशय बळावला असून माझ्या पत्नीचे काही बरे वाईट तर झाले नाही ना अशी शंका मनात घेऊन ती वारंवार संबंधित ऊस तोडीसाठी मजूर नेणाऱ्या मुकादमाकडे विचारणा करत आहे.
परंतु संबंधित मजुरांचा मुकादम हा गावातलाच असल्याने तो सधन असुन गावात शुद्ध दादागिरी करून आडदांड पद्धतीने वागत आहे. तसेच त्याचे सोयगाव व पाचोरा तालुक्याच्या सरहद्दीवर अवैधरित्या गावठी व देशी दारू विक्रीचे दुकान असून हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने संबंधित महिलेला तो कोणतीही दात देत नसल्याने आजच्या परिस्थिती संबंधित महिला पतीच्या विरहात वेड्यासारखी फिरत असून माझा पती कोठे असेल यासाठी गावातील सुज्ञ नागरिकांकडे व संबंधित मुकादमाकडे वारंवार विचारणा करत आहे.
याच महिलेला कुठेही दाद मिळत नसल्याने सरते शेवटी तिने संबंधित मुकादमाचे विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे जाण्याचे ठरवले असून आता पुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून संबंधित गुंडपणाने वागणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या मुकादमाने जसे मजूर सोबत नेले तसे घरी आणणे गरजेचे होते किंवा कामावरून हरवल्यावर लगेचच घटना घडली त्या परिसरातील संबंधित पोलीस स्टेशनला रितसर (मिसिंग) हरवल्याची नोंद करणे क्रमप्राप्त होते परंतु त्याने संबंधित मजुराला वाऱ्यावर सोडून दिल्याचे बोलले जात असून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याचा घातपात तर झाला नसेल ना अशी शंका व्यक्त केली जात असून संबंधित मुकादमाच्या वागणूकीविषयी शंका व्यक्त केली जात आहे.