सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत दाखल , रोहिणीताई खडसेंनीही बांधले हाती घड्याळ

माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत दाखल , रोहिणीताई खडसेंनीही बांधले हाती घड्याळ

By Satyajeet News
October 23, 2020
725
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.( पाचोरा ) – माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार ही चर्चा बऱ्याच महिन्यापासून सुरु होती या चर्चेला आला पूर्णविराम मिळाला असून
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे, माजी आ. गुरुमुख जगवाणी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, जळगावचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदाताई खडसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे, माजी आ. गुरुमुख जगवाणी, तळोदा येथील माजी आ. डॉ. नरेंद्र पाडवी, बोदवड येथील कृउबाचे माजी सभापती निवृत्ती पाटील, चाळीसगावचे माजी सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, मुक्ताई सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, भाजप सरचिटणीस संदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे यांचे मंचावर प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले.
औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे, जळगाव दूध संघाचे जगदीश बढे, सुभाष टोके, अतुल झांबरे, हेमराज चौधरी, जि. प. चे सभापती राजेंद्र चौधरी, माजी जि. प. चे सदस्य कैलास चौधरी, राम बोडके, श्रीगोंदाचे नवनाथ केदारे, भुसावळचे माजी शहराध्यक्ष वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, शिरपूरचे मनोज उत्तम महाजन, युवा मोर्चाचे सुमित बऱ्हाटे, सोशल मीडियाचे पृथ्वीराज पाटील, बसवलचे प्रमोद पाटील, गणेश किनगे, भुसावळचे अनिकेत पाटील, मातृभूमी मंडळाचे किशोर पाटील, भुसावळचे माजी सभापती सुनील महाजन, गोलू पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब देशमुख, मुक्ताईनगरचे माजी सभापती विलास धायडे, बोदवड बाजार समितीचे अनिल वऱ्हाडे, माजी जि. प. चे सदस्य दुर्गादास पाटील, माजी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संजीव पाटील, धुळे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, मुक्ताईनगरचे दशरथ कांडेलकर, जळगावचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, जळगावचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील, अमळनेर भाजपचे सुभाष चौधरी, माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन, धुळे भाजपचे गणेश मुकुंदे, पुणे येथील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ, कल्याण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळी, बोदवड पं. स. चे माजी सभापती गणेश पाटील, मुक्ताई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर.पी. बऱ्हाटे, चाळीसगावचे सतीश दराडे, जळगावचे चंदन कोल्हे, बुलढाणा जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप नाफडे, मुंबई युवा मोर्चाचे प्रशांत भिसे, गणेश पारडे, नंदुरबार भाजपचे वैद्यकीय आघाडी अध्यक्ष तुषार सनन्से, नंदुरबारच्या शामराव आघाडे, शहादा तालुक्यातील डोंगरगावचे सरपंच विजय पाटील, नंदुरबारच्या शिक्षक आघाडी अध्यक्ष के.एम. पटेल, बोदवड बाजार समितीचे उपसभापती अनिल पाटील, संचालक रामदास पाटील, योगेश पाटील, भीमराव पाटील, बोदवड तालुक्यातील लोणसिमचे सरपंच अंकित पाटील, अमळनेरचे बाजार समितीचे उपसभापती श्रावण ब्रम्हे, माजी संचालक कामराज पाटील, अमळनेर पं.स.चे माजी सभापती दीपक पाटील, अकोट, जि. अकोलाचे रामप्रभू तराळे पाटील, अकोल्याचे कृष्ण अंधारे, मनोज तायडे, रवी पाटील यांनी खडसे यांच्यासह पक्षांतर केले.
एकनाथराव खडसे भाजपा सोडून गेल्यानंतर भाजपाला मोठे भगदाड पडले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचे समजते
परंतु एकनाथराव खडसे यांचे काही समर्थक अद्याप हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून खडसे यांना राष्ट्रवादीत गेल्यानंतर कोणते स्थान मिळते राष्ट्रवादी खडसेंना कितपत न्याय देते हे पडताळून पाहील्यावर तेही भाजप सोडणार आहेत
तर दुसरीकडे काही भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेचा झेंडा हाती घेणार असल्याचे चित्र दिसत आहे

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 182
Previous Article

माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत दाखल , ...

Next Article

माळी समाजाचे ओबीसी नेते खडसे समर्थक अनिल ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    वडगाव आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी ४ व १० सदस्य पदासाठी ५८ अर्ज दाखल.

    October 21, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    प्रविण दरेकरांनी शेण खाल्लं’; पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन.

    September 15, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    शिवसेनेच्या उपनेत्या मा. सुषमा ताई अंधारे यांच्या जाहीर सभेला जळगाव पोलीसांकडून मज्जाव, ठाकरे सेनेकडून तिव्र निषेध.

    November 5, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    दुसऱ्यांच्या ऐकून झाल्या गप्पा, आता आमचा नेता किशोर आप्पा, अमोल शिंदेंना दे धक्का, विठ्ठलाच्या साक्षीने अनिल शिंदेसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

    July 4, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    जनतांत्रिक समता पार्टी के उम्मीदवार पवन केशव जैन इनका वासिम विधानसभा चुनाव के लिए नामांकन दाखिल।

    November 9, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपा पक्ष कार्यालयाचे उदघाटन संपन्न

    November 15, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    वावडदा परिसरात सट्टा बिटींग जोमात , कायद्याचे रक्षक कोमात.गुन्हेगारीला मिळतेय आमंत्रण.

  • ब्रेकिंग न्यूज

    आश्वासनाच्या ढगाळ वातावरणात, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मैदानावर पैशांचा पाऊस.

  • पाचोरा तालुका.

    खडकदेवळा येथे कुत्र्याच्या हल्ल्यात ८५ वर्षीय वृध्द जबर जखमी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज