पाचोरा शहरात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०७/२०२२
राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय भाजपाने घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदाची धुरा भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सोपविण्यात आली असून पाचोरा शहरातून यानिमित्ताने आज दिनांक ०१ जुलै २०२२ शुक्रवार रोजी पाचोरा शहरात आनंदत्सव साजरा करण्यात आला या वेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघावयास मिळाला.
सकाळी ११:३० वाजता भाजपा कार्यालया पासुन भव्य रॅली काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ढोल ताश्यांच्या गजरात फटाके वाजवून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, शहर अध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, रेखा पाटील, माजी नगरसेवक विष्णु अहिरे, माजी शहर अध्यक्ष नंदु सोमवंशी, हिम्मतसिंग निकुंभ, गोविंद शेलार, बाळकृष्ण धुमाळ सह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार संघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.