शिक्षण संस्थेच्या निवडणुकीतही सौदेबाजी, एका मतासाठी दहा ते पंचवीस हजारांची बोली.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१०/२०२२
(लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरी, बुध्दीवंतांच्या नशिबी मोलमजुरी. ही शोकांतिका आहे.)
पाचोरा तालुक्यातील एका शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत रथी, महारथी या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने या निवडणुकीत निवडून येण्यासाठी मतदान आपल्याच पारड्यात टाकले पाहिजे याकरिता पदानुसार मतदारांना दहा हजार रुपयांपासून तर पंचवीस हजारांची बोली लावण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे या शैक्षणिक संस्थत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था असून ही संस्थेचा बोगस शिक्षक भरती व विविध कारणांनी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजावाजा झालेला आहे. कारण मागील काळात या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कारभार एका दहावीचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या हातत होती म्हणून या विद्यालयातील पालकवर्ग व पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कारण शिक्षण क्षेत्रात जर कमी शिकलेली व्यक्ती कारभार सांभाळत असेल तर मग नवनवीन येणारे अभ्यासक्रम, शिक्षणक्षेत्रात झपाट्याने होणारा बदल याबाबत काय सुधारणा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
कारण सरस्वतीच्या मंदिरात लक्ष्मी वरचढ ठरत होती व आजही लक्ष्मीच वरचढ ठरत आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण सद्यस्थितीत घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवारांनी आपापल्या परीने एका मतासाठी दहा हजार रुपयांपासून तर पंचवीस हजार रुपयांची बोली लावून मदतान विकत घेण्यासाठी खटाटोप सुरु केला असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाले असून याबाबत खमंग चर्चा गावभर होतांना दिसून येते आहे.