मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याने खडसेंना भाजपाने दूर केले: मेहबूब शेख

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२२
भाजपा हा पक्ष ओ. बी. सी. विरोधी असुन त्यांनी राज्याला इम्पेरिकल डाटा दिला नाही. ज्या बहुजन समाजातील नेत्यांनी २५ ते ३० वर्ष पक्ष वाढविण्याचे काम केले ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होत असतांनाच त्यांना खड्यासारखे बाजुला केले. एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारून त्यांच्याच घरातील वारसांना तिकीट देवून मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या भितीने निवडणुकीत इतर पक्षांशी हातमिळवणी करून पाडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.
ते पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालया जवळील प्रांगणात शरद युवा संवाद यात्रे निमित्त बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. आ. दिलीप वाघ हे होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना मेहबुब शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर
टिकास्त्र सोडत गिरिश महाजन यांना नाव न घेता पिस्तुल्याची उपमा दिली. माजी आ. दिलीप वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना सांगितले की, राज्यातील आघाडी सरकार मध्ये असलो तरीही पक्ष वाढविण्याची जबाबदारी युवकांवर असल्याने भविष्यात होवु घातलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढविणार असल्याने त्यात युवकांना मोठ्या प्रमाणात संधी
दिली जाणार असल्याने युवकांनी घरा घरा पर्यंत पोहचुन पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवकांचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, मा. आ. दिलीप वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, पी. टी. सी. चे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील,
शालिग्राम मालकर, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, पिपल्स बँकेचे संचालक प्रकाश पाटील, डॉ. सागर गरुड, नगरसेवक भुषण वाघ, अशोक मोरे, बशीर बागवान, पंचायत समितीचे गटनेते ललित वाघ, डॉ. पी. एन. पाटील, सुदाम वाघ, सिताराम पाटील, योगेश देसले व्यासपीठावर होते. यावेळी दत्ता बोरसे, ए. बी. अहिरे, प्रा. मनिष बाविस्कर, सतिष चौधरी, हारुन देशमुख, युवकांचे तालुका अध्यक्ष अभिजीत पवार, शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, वैभव पाटील, किशोर डोंगरे, हेमंत पाटील, प्रविण वाघ, अॅड. अविनाश सुतार, बंटी पाटील, गौरव शिरसाठ, सचिन शिंदे, दर्शन शिरसाठ, रविंद्र राठोड उपस्थित होते. कार्यक्रमात मा. आ. दिलीप वाघ, मजहर पठाण, नितीन तावडे, रविंद्र पाटील, योगेश देसले, शेख रसुल शेख उस्मान, विकास पाटील, अभिजीत पवार यांनी मार्गदर्शन केले.