लोहारी येथील संदीप पाटील (मुन्ना भाऊ) जारगाव गणातून शिवसेनेतर्फे (ठाकरे) उमेदवारी करण्यासाठी इच्छुक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. या निवडणुकीत उमेदवारी लढवण्यासाठी गावागावातून आपापल्या गट व गणातून उमेदवारी लढवण्यासाठी बरेचसे जुने नवे चेहरे समोर येत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारची झालेली उलथापालथ तसेच शिवधनुष्या बाबतचा न्यायालयीन निर्णय अद्यापही जाहीर झालेला नसल्याने ऐनवेळी नेमकं काय घडत या महत्त्वाच्या विषयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तरीही जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी लढवण्यासाठी भल्याभल्यांनी आपली पायपिट सुरु केली असून कोणत्या ना कोणत्या कारणाने जनसंपर्कात जावून जनमत जाणून घेत आहेत व प्रसारमाध्यमांचे मार्फत जनतेपर्यंत आपली भुमिका मांडत आहेत.
या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील संदीप भास्करराव पाटील (मुन्ना भाऊ) हे जारगाव गणातून मा. उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. कारण की संदीप पाटील यांचे वडील स्व. भास्करराव पाटील हे पाचोरा तालुक्याचे सभापती असतांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये व आशिर्वादाने संदीप भास्करराव पाटील यांचे मोठे बंधू स्वर्गीय मनोज भास्करराव पाटील यांनी लोहारी बुद्रुक येथे १९८४ मध्ये महाराष्ट्रात पहिली ग्रामीणची शाखा स्थापन केली होती.
तेव्हा पासून संदीप पाटील यांच्या घराण्यातील सर्व सदस्य शिवसैनिक आहेत. म्हणून पाचोरा तालुक्यातील जारगाव गणातून ही प्रथम पंचवार्षिक निवडणुक होत आहे. या निमित्ताने जारगाव गणातील जनतेच्या रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक सुविधा, तसेच गावागावातून व्यायामशाळा, वाचनालय, सभामंडप, शेत रस्ते, गोरगरिबांना स्वस्त धान्य, घरकुल व विविध योजना मिळवून देण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी द्यावी अशी आशा व्यक्त केली आहे.