शेंदूर्णी रासेयो एकक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने समुपदेशन केंद्रास सुरवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०५/२०२१
जामनेर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी व अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने समुपदेशन केंद्राची सुरवात करण्यात आली. याद्वारे कोविड व कोविड नंतरच्या परिस्थितीत उडभवणाऱ्या मानसिक समस्यां विषयी रुग्णांना,नागरिकांना समुपदेशन करण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना निश्चितच मदत मिळणार आहे.
समुपदेशन केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील हे होते. या उद्घाटन प्रसंगी समुपदेशन केंद्र स्थापण्यामागची भूमिका महाविद्यालयालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी मांडली.त्यांनी प्रस्तविकात रासेयो एककाच्या वतीने समुपदेशक म्हणून ते स्वतः व चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.मोहिनी उपासनी सेवा देणार असल्याचे सांगितले.
या समुपदेशन केंद्राचे प्रमुख उदघाटक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.राहुल निकम होते. त्यांनी आपल्या उदघाटकीय मनोगतात आजकाल कोविड च्या महामारी मुळे जनतेच्या मानसिक स्थितीत प्रचंड उलथापालथ झाली असून तणावाखाली असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले.तसेच रुग्णांसाठी जिल्हा मानसोपचार विभाग सुद्धा तत्पर असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी आलेल्या विपत्तीला संपत्ती समजून आव्हानांचा धैर्याने करण्याचा सल्ला उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना केला. या गंभीर परिस्थितीत आरोग्य यंत्रणा आपली ढाल बनून काम करीत असल्याचे प्रतिपादन करून उपस्थित रासेयो सवसेवकांचे कौतुक केले.त्यांनी समुपदेशन केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक करून अश्या पद्धतीने रासेयो एककाची मदत समाजकार्यासाठी कायम राहील असे स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय दादा गरुड व सचिव सतीश चंद्रजी काशीद यांनी शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.समुपदेशक म्हणून डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पटील व प्रा.डॉ.मोहिनी उपासनी हे ऑन कॉल सेवा देणार आहेत.
या समुपदेशन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम साळुंखे, उपप्राचार्य व कबचौ उमवि राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य प्रा.डॉ.संजय भोळे तसेच ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक सागर तडवी व आभार सचिन कुंभार यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक व्यंकटेश उपाध्ये,भारत निकम,माऊली उर्फ किरण सुरवाडे,राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.