आजादी का अमृत महोत्सव निमित्त गरुड महाविद्यालय शेंदुर्णीत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०८/२०२२
विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयात दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ मंगळवार ते १५ ऑगस्ट २०२२ सोमवार या संपूर्ण आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात “हर घर तिरंगा” या अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आवाहन पर व्हिडिओ बनविण्यात आला होता. तो चांगलाच व्हायरल झाला.
दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ क्रांती दिनाचे औचित्य साधून शहिदांचे स्मरण, प्रतिमापूजन करण्यात आले. दिनांक १० ऑगस्ट २०२२ बुधवार रोजी वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली यात प्रथम क्रमांक स्वप्निल युवराज जाधव, द्वितीय क्रमांक अंजलीका हटकर, तृतीय क्रमांक माजी विद्यार्थी अक्षय गवळी उत्तेजनार्थ प्रथम वैष्णवी संजय नाथ, उत्तेजनार्थ द्वितीय गायत्री सुकलाल पाटील या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.
वक्तृत्व स्पर्धेसाठी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान आणि अमृत महोत्सव भारत असे विषय देण्यात आलेले होते. दिनांक ११ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी महाविद्यालयातून पथयात्रेचे रॅली आयोजन करण्यात आले. यात संपूर्ण गावात जाऊन पथनाट्य महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सादर केले. एकूण २२ विद्यार्थ्यांच्या संघाने दोन वेगवेगळ्या पथनाट्यांच्या माध्यमातून लोकांना ‘हर घर तिरंगा’ चे आवाहन केले.
त्याच पद्धतीने रेकॉर्डेड ऑडिओ च्या माध्यमातून ग्रामस्थांना ‘हरघर तिरंगाचे’ आवाहन करण्यात आले. सदर रॅलीचे वैशिष्ट्य असे की, रॅलीमध्ये एकूण ७५ माजी विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला. दिनांक १२ ऑगस्ट २०२२ शुक्रवार रोजी विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे काव्यवाचन स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल वाघ, द्वितीय क्रमांक सेजल बोरकर आणि तृतीय क्रमांक स्वप्निल जाधव, उत्तेजनार्थ प्रथम मयुरी चौधरी यांनी प्राप्त केला.
स्वराज्य महोत्सव अंतर्गत शहीद स्वर या बहारदार देशभक्तीपर गीतांचा गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात दिनांक १३ ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी करण्यात आलेले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक सेजल बोरकर, द्वितीय क्रमांक स्वप्निल जाधव, तृतीय क्रमांक ज्यू ग्रूप आणि उत्तेजनार्थ बक्षीस स्नेहल वाघ यांनी प्राप्त केले. यासोबतच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी परिसरातील ७५ वय वर्ष पूर्ण केलेले सन्माननीय नागरिकांच्या घरी जाऊन सत्कार करून त्यांचा गुणगौरव केला. या उपक्रमातून त्यांचे स्वातंत्र्य काळातील अनुभवही जाणून घेतले. गुणगौरवासाठी महाविद्यालया तर्फे माजी विद्यार्थी संघ आणि आचार्य समर्पण यांच्या माध्यमातून १५०० अमृत महोत्सवी लोगो बनवून त्यांचे वाटप परिसरात करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत तिरंगा वाटप महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. डॉ. सोनल तायडे यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ दिली.
सदर कार्यक्रमात विद्यार्थी, समाज, माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमांसाठी दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव श्री. सतीश चंद्र काशीद, संचालिका सौ. उज्वलाताई काशीद, सहसचिव श्री. दीपकभाऊ गरुड, वस्तीगृह सचिव श्री. कैलासभाऊ देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर पाटील, उपप्राचार्य यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे अधिकारी डॉ. वसंत पतंगे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजिनाथ जीवरग, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. रोहिदास गवारे, सहायक महिला अधिकारी डॉ. सुजाता पाटील आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.