पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये हजर झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला मागील एक महिन्यापूर्वी बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांनी पदभार स्वीकारल्यापासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावागावातील सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारु या अवैधधंद्यांचे विरोधात धाडसत्र राबवून धडक कारवाई करत असल्याने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून जनमानसातून विशेष करुन महिलावर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी त्यांचे सहकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील, अरुण पाटील(राजपूत),संदिप राजपूत,ज्ञानेश्वर बोडके, रवींद्र पाटील, सचिन वाघ,संभाजी मराठे व इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील
लोहारी,शिंदाड,शेवाळे,सातगाव डोंगरी,सार्वे,लोहारा या गावात धाडसत्र राबवून या गावपरिसरातील गावठी दारु निर्मिती अड्डे, गावठी दारू विक्री, सट्टा बेटिंग, जुगाराचे अड्डे उध्वस्त करत गावठी दारु बनवण्यासाठी लागणारे हजारो रुपये किंमतीचे कच्चे रसायन व तयार दारु नष्ट केल्यामुळे अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून या कारवाईत असेच सातत्य ठेवून गावागावातील अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करुन गोरगरिबांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.