रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या मुनिश्री, महाराज साहेब यांची कठोर तपसाधना.
गौरव जैन.(नेर कुसुंबा)
दिनांक~१२/०४/२०२२
कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असली, तरीही यामुळे जैन मुनि श्री, महाराज साहेब साध्वीच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. एरव्ही उन्हाळा असो पावसाळा असो या हिवाळा असो कोणताही ऋतू असो मोक्ष पथगामी मार्गाकडे जात असतांंना २८ मुलगुणांचे निर्दोष पालन करण्यासाठी उष्ण परिषह सहन करून त्यावर जय मिळवतात अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी, प्रमुख पत्रकार आणि कुसुंबा अतिशय क्षेत्राचे विश्वस्थ सतीश वसंतीलाल जैन कुसुंबा यांनी दिली.
दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याची धाडस कोणीच करत नाही. मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन मुनि महाराज साहेबा साध्वी याला अपवाद आहेत सूर्य कितीही आग ओकत असला तरीही ते रोज अनवानी पायाने बाहेर पडतात. या त्यांच्या सहनशीलतेला आणि त्यागमय संयम जीवनाला सर्वच जण त्रिवार नमन करतात.
“धन्य धन्य ते जीवन ,धन्य ती तपसाधना” असे उद्गार आपोआपच निघतात. २४ तासात आहारा प्रसंगी एकाच वेळी आहार व पाणी ग्रहण करीत असतात आपण वातानुकुलीत खोलीमध्ये बसून वाढलेल्या तापमाना बाबत रडगाणे गात असतो. पण जैन मुनिवरांची, महाराज साहेबांची साध्वींची दिनचर्या प्रतिनिदिनासारखीच असते. पूज्य तपस्वी त्यागीगण रखरखत्या उन्हामुळे आहार विधीसाठी (गोचरी भिक्षाचर्या करण्यासाठी) अनवाणी बाहेर पडतात. दिगंबर अवस्थेत अंगाला उन्हाचे चटके, तापलेल्या रस्त्यांवरचे पायांना चटके, तपस्वी मुनीश्री व महाराज साहेब-साध्वीं ना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते.
एवढ्या कडक उन्हात व तापलेल्या रस्त्यांवर ते कसे चालत असतील असा प्रश्न पडून सर्वांच्याच माना श्रद्धेने झुकतात. जैन त्यागी तपस्वी उन्हाने तापलेल्या रस्त्यावरती चालू शकतात कारण त्यांच्याकडे त्याग व कठीण साधनेची बल आहे. पंचेंद्रिय यावर त्यांचा विजय प्राप्त केला आहे. कर्माची निर्जरा कठीण साधनेच होते. जैन मुनि महाराज साहेब साध्वीची साधना व तपस्या करतात त्याबाबत सामान्य व्यक्ती विचारही करू शकत नाहीत. या साधनेच्या बळावर ते भगवान महावीर यांच्या संदेशाचा संपूर्ण जगात प्रसार करीत आहे. अनेक भाविक भगवान महावीर यांच्या मार्ग आत्मसात करण्यासाठी जैन मुनी आणि साध्वी सोबत चालायला लागतात. असेच सध्यास्थीत उष्ण तापमानात आचार्य श्री वर्धमान सागर जी महाराज यांचे विशाल संघासहित पूज्य श्री कुसुंबा ते महावीरजी क्षेत्र (राजस्थान) १००० किलोमीटर पदयात्रेद्वारे विहार करीत आहेत.