पिंपळगाव हरेश्वर येथे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे महाशिवरात्री निमित्त बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२२
पिंपळगाव हरेश्वर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे भाविक, भक्तांना महाशिवरात्री निमित्ताने एकाच वेळी, एकाच ठिकाणी बारा ज्योर्तिलिंग दर्शनाचा लाभ घडवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दर्शन सोहळ्याचा शुभारंभ गोठाणपुरा, (महात्मा फुले माळी मंगल कार्यालय पिंपळगांव हरेश्र्वर) येथे दिनांक ०५ मार्च शनिवार रोजी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आला.
हा दर्शन सोहळा दिनांक ०६ मार्च रविवार ते ०९ मार्च बुधवार २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आला असून दररोज सकाळी १० वाजेपासून तर रात्री ०८ वाजेपर्यंत भाविक, भक्तांनी दर्शन घेण्यासाठी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय पिंपळगाव हरेश्वर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
या दर्शन सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी जलगाव येथील जळगाव झोन संचालिका मीनाक्षी दीदी (पिंपळगाव हरेश्वर), येथील ललिता दीदी (प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवार पिंपळगाव हरेश्वर), पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक या. श्री.महेंद्र वाघमारे, उपसरपंच सुखदेव गीते सर, डॉ.शांतीलाल तेली, बी,आर,महाजन सर, संदीप पाटील सर, कैलास आप्पा क्षिरसागर, राजू दादा क्षीरसागर, संजय झेरवाल सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच याप्रसंगी बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या भव्य, दिव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे वैशिष्ट्य असे की, ८६ वी त्रिमूर्ति शिवजयंती (महाशिवरात्री महोत्सव) प्रिय आत्मिक बंधू व भगिनींनो,सर्व श्रेष्ठ पर्व ‘महाशिवरात्री’ अर्थात आपल्या सर्व आत्म्यांचे पारलौकिक परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिव निराकार यांच्या दिव्य व अलौकिक अवतरणाचा ‘स्मृती दिवस’ होय. आध्यात्मिक दृष्टीने रात्री हा शब्द अज्ञान अंधःकार व आसुरी लक्षणांचा सूचक आहे. आज जगात पापाचार, दुराचार, भ्रष्टाचार यांचे थैमान चरम सीमेला पोहोचले आहे. श्रीमद् भगवत गीतेत वर्णन केल्याप्रमाणे ‘अतिधर्मग्लानीची’ हीच ती वेळ आहे. अधर्माचा विनाश, सत्धर्माची स्थापना करण्यासाठी परमात्म्याचे दिव्य अवतरण या सृष्टीवर झाले आहे. भारतीय उपखंडात काही स्थानांवर १२ ज्योतिर्लिंगाच्या सुंदर रूपांची स्थापना झालेली आहे. जी द्वादश ज्योतिर्लिंगम् या नावाने अखिल विश्वात प्रसिध्द आहे. अशी माहिती आयोजकांतर्फे दिली आहे.
ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्रीच्या पावन पर्वादर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पुण्यनगरीत विशाल व भव्य १२ ज्योर्तिलिंगम् व मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तरी आपण सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.