पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला केले जेरबंद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०७/२०२२
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला दिनांक ११ जून २०२२ शनिवार रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२०२२ भा.द.वि. कलम ३७६ (२) (के) ३६५, ३४२, ३२६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी नामे अभिमान ऊर्फ आबा अंबादास वाघमारे (कोळी) वय २६ वर्षं राहाणार घोसला ता. सोयगाव जिल्हा. औरंगाबाद हा फरार झाला होता.
आरोपी फरार झाल्यापासून त्याचा शोध घेऊन अटक करण्यासाठीचे एक मोठे आव्हान पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांसमोर होते. या फरार आरोपीच्या अटकेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे व पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोकुळ सोनवणे ६९२, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील ८३ यांनी शोध घेऊन ताब्यात घेत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला हजार केल्याने दिनांक १६ जूलै २०२२ गुरुवार रोजी अटक करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. मा. श्री. प्रवीणजी मुंढे साहेब, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. रमेश चोपडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. भारतजी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करित आहेत.