शेंदुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची मनमानी ग्राहक त्रस्त.

किरण चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~१९/०७/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे मोठ्या लोकसंख्येचे व महत्वाची बाजारपेठ तसेच शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे गाव असून शेंदुर्णी गावात भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याकारणाने सधन शेतकरी तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्ग असल्याकारणाने दररोजची आर्थिक उलाढाल विक्रमी आहे. आर्थिक उलाढाल आली म्हणजे बँके शिवाय व्यवहार होणे अश्यक्यच म्हणून जास्तीत, जास्त व्यापारी, शेतकरी व विद्यार्थीवर्ग आपला दैनंदिन व्यवहार करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य देतात व या कारणांमुळे अशा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सहजच ग्राहकसंख्या हजारोने असते व बॅंक ग्राहकांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळाव्यात म्हणून बॅंकेचे कामकाज सुरळीतपणे व्हावे म्हणून बॅंक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात उपलब्ध करून दिलेली असते तसेच आता ऑनलाइन सुविधा असल्याकारणाने सर्व व्यवहार हे पेपरलेस होत असल्याने घंटोका काम मिंनटमे होत असलेतरी तरी मात्र काही बॅंका व बरीचश्या शासकीय कार्यालयातील कामचुकार अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला विनाकारण अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत..
असाच काहीसा प्रकार शेंदुर्णी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत सुरु असून या बॅंकेत सुरु असून या बॅंकेचे व्यवस्थापक व कर्मचारी बॅंकेच्या नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांना तसेच नवीन खाते उघडण्यासाठी येणाऱ्या लोकांना तसेच विद्यार्थ्यांना व्यवस्थीत वागणूक देत नसल्याने अनेक ग्राहक, सर्वसामान्य लोक व विशेष करुन विद्यार्थीवर्ग त्रस्त झाला आहेत. कारण आता नुकतेच शाळा, कॉलेज नियमितपणे सुरु झाले असुन शासनाच्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॅंकेचे खाते उघडल्याशिवाय योजनांचा लाभ मिळूच शकत नसल्याने जास्तीत, जास्त विद्यार्थी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
तसेच शेंदुर्णी गावात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थीसंख्या भरपूर आहे. तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळत असल्याने भारतीय स्टेट बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी सर्वसामान्य लोक व विद्यार्थी जातात परंतु बॅंकेत खाते उघडण्यासाठी गेल्यानंतर तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात व उद्या या परवा या नंतर बघू असे सांगून खाते उघडण्यासाठी तसेच नियमितपणे व्यवहार हकरणाऱ्या खातेदारांना पुस्तकावर झालेल्या व्यवहाराची माहिती जाणून घेण्यासाठी पुस्तक प्रिंट (पंच) करुन देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे खातेदारांनी सांगितले आहे.
तसेच नवीन खाते उघडण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला आमचीच बॅंक दिसते का इतर बॅंकेत जाता येत नाही का आमचीच बॅंक दिसते का असे बोलून आता वेळ नाही नंतर बघू अशी उत्तरे मिळतात तसेच आमच्याबद्दल तक्रारी करतात म्हणून तुमचे काम आता आमच्या मताप्रमाणे होईल असा छळवाद केला जात असल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे शाखा व्यवस्थापक हे ग्राहकांना भेटत नसून कर्मचारी अरेरावीची भाषा करतात अश्याही तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने या बॅंकेच्या व्यवस्थापक व कर्मचारी यांना वरिष्ठ पातळीवरुन समज देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.