अज्ञाताने कापूस पिकावर तन नाशक फवारल्याने, अर्धा एकरातील कपाशीची झाडे करपली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील अल्पभूधारक शेतकरी श्री. तुळशीराम किसन बोरसे यांचे कुऱ्हाड येथील मरीआई मातेच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेत शिवारात अडीच एकर शेतजमीन आहे.
त्यांनी त्यांच्या या मालकीच्या शेतात कापूस पिकाची लागवड केली असून यावर्षी निसर्गाच्या कृपेने पाऊसपाणी व्यवस्थित असल्याने कापसाचे पिक जोरदार बहरले होते. परंतु म्हणतात ना (कुत्र्याला गती व माणसाला प्रगती) सहन होत नाही अश्या प्रवृत्तीच्या एका अज्ञान इसमाने तुळशीराम बोरसे यांच्या शेतातील कपाशीच्या झाडांवर तन नाशक फवारल्याचे तुळशीराम बोरसे शेतात गेल्यावर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही घटना गावात येऊन सांगितली तसेच तन नाशक फवारणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात तुळशीराम बोरसे लवकरच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन, पाचोरा तहसीलदार साहेब व कृषी विभागाकडे रितसर तक्रार देण्यासाठी जात आहेत.
तुळशीराम बोरसे हा अत्यंत कष्टाळू असल्याने व स्वताची फक्त अडीच ऐकर शेत जमीन असल्याने दुसऱ्याकडे रोजंदारीवर काम करुन त्याने बि, बियाणे, खते घेऊन कापूस पिक लावले आहे. अश्या बिकट परिस्थितीत जवळपास अर्धा एकर कापूस पिकाचे नुकसान झाल्यामुळे ते हतबल झाले आहेत. तरी त्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.
असे गैरप्रकार करणारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली असून सगळ्याच शेतकऱ्यांनी मनात धास्ती घेतली असून सगळ्यां सावधगिरी बाळगून रहावे असे सुचित करण्यात आले आहे.