घोडसगा धरणाच्या सांडव्याची भिंत फुटल्याने पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेले पाचोरा तालुक्याच्या शेवटच्या हद्दीतील व मराठवाड्याच्या सुरवातीला बहुळा नदीवर घोडसगा धरण बांधण्यात आले असून सततच्या पावसामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत आहे.
विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यातील डोंगराळ भाग असल्याने अनेक नद्या व नाल्यांचे पाणी तसेच सोयगाव तालुक्यातील झिंगापूर धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात घोडसगा धरणात येत असल्याने हे परिपूर्ण शंभर टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
अश्यातच या घोडसगा धरणाच्या सांडव्याची भिंत अचानकपणे मध्यभागी फुटल्याने पाण्याचा विसर्ग वाढला असून या बहुळा नदिला महापुराचे स्वरूप प्राप्त झाले असून या नदीकाठचे पिंपळगाव हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, वरखेडी खुर्द, वरखेड बुद्रुक, लासुरा तसेच लोहारी या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पिंपळगाव हरेश्वर येथील दिलीप जैन, शालीकराम मालकर व सुज्ञ नागरिकांनी केले आहे.
तसेच वरील गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील व इतर समाजसेवकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी सुचवले असून सांडव्याची भिंत फुटल्याबाबतची माहिती मा.प्रांताधिकारी साहेब, मा.तहसीलदार साहेब व पाटबंधारे विभाग पाचोरा यांना कळवण्यात आले असल्याचे समजते.