लोहारा येथे भुरट्या चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडले, मात्र डबल शटर असल्याने चोरीचा प्रयत्न फसला.
दिलीप जैन.(लोहारा)
दिनांक~२७/०९/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी डोके वर काढले असून दिनांक २६ सप्टेंबर रविवार ते २७ सप्टेंबर सोमवार चे रात्री लोहारा येथील बसस्थानक परिसरातील न्यू झेप इंडिया चे प्रतिनिधी अतुल माळी यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानाला डबल शटर असल्याने व कुणाचीतरी चाहूल लागल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला असल्याचे दिसून येते.
अतुल माळी नियमित प्रमाणे दिनांक २७ सप्टेंबर सोमवारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. परंतु दुकानाला डबर शटर असल्याने चोरांचा हेतू साध्य झाला नाही. दुकानाची पाहणी केल्यावर कोणतेही नुकसान झाले नसल्याचे दिसून आले.
लोहारा येथे मोठी बाजारपेठ असून येथील बसस्थानक परिसरात अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यापारी आहेत, या भागात कित्येक वेळा अश्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापारी भयभीत झाले आहेत. तसेच बसस्थानक परिसरासह गावात इतर ठिकाणी सट्टा पेढ्या, अवैध दारुची विक्री व जुगाराचा अड्डा हे अवैधधंदे सुरु असून हे व्यसनाधीन लोक व्यसन पूर्तीसाठी चोरीचा मार्ग स्विकारत असल्याने लोहारा गावपरिसरातील अवैधधंदे त्वरीत बंद करावे अशी मागणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला नव्यानेच बदलून आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांच्याकडे करणार आहेत.
(लोहारा गावातील अवैधधंदे करणारांना राजकीय तसेच तथाकथीत स्थानिक पुढारी म्हणवून घेणारांचे पाठबळ मिळत असल्याने अवैधधंद्यांचे विरोधात कारवाईत अडथळे येतात असेही दबक्या आवाजात बोलले जाते तरी पोलिस प्रशासनाने कुणाच्याही दबावाला बळी न पडता धडक कारवाई करुन अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी होत आहे.)