मोबाईल चोरटा अडकला पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांच्या जाळ्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी अजय पदमसिंग परदेशी यांनी त्यांच्या राहत्या घरात दोन मोबाईल चार्जिंग करण्यासाठी लावलेले होते. हे चार्जिंगला लावलेले मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत अजय पदमसिंग परदेशी यांनी दिनांक २० मे २०२२ शुक्रवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार हे करीत होते त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल २४४४ अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ८३ जितेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ९६४ संभाजी सरोदे, पोलीस कॉन्स्टेबल ४७६ पंकज सोनवणे यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपी पप्पु आबा राखुंडे वय २१ वर्षे रा श्रीरामनगर सिंधी कॉलणी पाचोरा तालुका पाचोरा यास दिनांक १२ जूलै २०२२ मंगळवार रोजी अटक करून त्याचे कडून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला एक मोबाईल हस्तगत केला आहे.
सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो भारत काकडे, सपोनि एम ए वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करित आहेत.