सागर चौधरी व योगेश चौधरी यांचा पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी केला सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत व डॉ. प्रितेष संकलेचा यांच्या घरी दिनांक १२ जून २०२२ रविवार रोजी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास चोर चोरीचा प्रयत्न करत असतांनाच वरखेडी येथील सागर अशोक चौधरी यांच्या प्रसंगावधानामुळे व त्याने हिंमतीने चोरट्यांशी दोन हात करत चोरट्यांना पळवून लावल्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व पुढील अनर्थ टळला होता. या सागर चौधरीच्या व त्याचे भाऊ योगेश चौधरीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सागर चौधरी व त्यांचे भाऊ योगेश चौधरी यांच्या धाडसाने बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत व डॉ. प्रतेश संकलेचा यांच्याकडे चोरी करण्यासाठी आलेले चोरट्यांना पाळुन लावले होते. यामुळे बॅंकेचे होणारे नुकसान थांबले याप्रसंगी सागर व योगेश यांनी दाखवलेली हिंमत व चोरट्यांना पाळुन लावण्यासाठी जिवावर खेळून केलेल्या संघर्ष याची दखल पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांनी काल दिनांक ०२ जूलै शनिवार रोजी सागर चौधरी व योगेश चौधरी यांना पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला बोलावून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन सन्मानित केले.
या सत्कार समारंभ प्रसंगी वरखेडीचे प्रथम नागरिक मा. श्री. धनराज आण्णा विसपुते, ग्रामपंचायत सदस्य मेजर संजय पाटील, पोलीस पाटील मा. श्री. बाळु भाऊ कुमावत, पो. हे. कॉ. माळी दादा, पो. ना. शिवनारायण देशमुख. पो. हे. कॉ. राकेश खोंडे, पो. हे. कॉ. पांडुरंग गोरबंजार, पो. कॉ. ज्ञानेश्वर बोडखे पो. कॉ. दिपक पाटील, पो. कॉ. मुकेश लोकरे, पो. कॉ. पंकज सोनवणे, पो. कॉ. दिपक बडगुजर, पो. कॉ. संभाजी सरोदे, पो. कॉ.अमोल पाटील, पो. कॉ. प्रमोद वडीले, वाहन चालक दिपक अहिरे, म. पो. शि. योगिता ताई चौधरी, म. पो. शि. भावसार ताई शिपाई सागर सावळे,व पोलीस ठाण्याचे ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.