पाचोरा तहसील कार्यालयासमोर हरीभाऊ पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०७/२०२२
पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या उपचारामुळे दिनांक १०/५/२०२२ रोजी नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला पावडरचे दुध पाजल्यामुळे मयत बाळाची प्रकृती खालावल्यामुळे सदर बाळाला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. म्हणून बाळाचा झाला मृत्यू आहे. याबू बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दिनांक हरीभाऊ पाटील यांनी १३/६/२०२२ रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात केली होती.
त्या अनुषंगाने संबंधित म. जिल्हा शल्यचिकित्सक सो. जळगांव यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवस स्थगित करावे असे लेखी पत्र त्यांच्या कर्मचाऱ्याच्या हस्ते देवुन विनंती केल्यामुळे हरीभाऊ पाटील यांनी सुरू असलेले आमरण उपोषण तुर्त १० दिवसांसाठी स्थगित केले होते. परंतु संबंधित म. जिल्हा शल्यचिकित्सक सो. यांनी १० दिवसांच्या केलेल्या विनंती नुसार कोणतीही योग्य कार्यवाही केली नाही आणि तसा १० दिवसांत कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याने तसेच हरीभाऊ पाटील यांनी म. जील्हा शल्यचिकित्सक सो. जळगांव यांना १० दिवसाची म्हणजेच ३/७/२०२२ पर्यंत दिलेली वाढीव मुदत संपली तरीसुद्धा म. जिल्हा शल्यचिकित्सक सो. जळगांव यांनी मयत बाळाच्या मृत्यूची कोणतीही दखल घेतली नाही. आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही.
म्हणून दिनांक ०४/०७/२०२२ पासुन हरीभाऊ पाटील पाचोरा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी पाचोरा तालुक्यातील सर्व सुज्ञ अभ्यासु नागरिकांनी दिनांक १३/०६/२०२२ रोजी सुरू असलेल्या उपोषणास प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद आता पुन्हा दिनांक ०४/०७/२०२२ पासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाला प्रतिसाद देवुन मयत बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी नम्र विनंती हरीभाऊ पाटील यांनी केली आहे.
तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालया पासुन त्रस्त नागरिकांनी उपस्थिती देवुन आपल्या समस्यांचा मांडून आपला अभिप्राय नोंदवावा अशी विनंती सर्व तालुकावासियांना केली आहे. तसेच आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल तरच आपण मयत बाळाला व त्याच्या परिवाराला न्याय मिळवुन देवु शकतो असे मत व्यक्त करत सुज्ञ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आमरण उपोषणास उपस्थिती द्यावी अशी नम्र विनंती श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील. संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा. यांनी केली आहे.