पिंपळगाव हरेश्र्वर येथील बहुळा नदीच्या पुलाजवळ असलेला जिवघेणा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा, राजेंद्र महाजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून आजच्या कागदोपत्री नोंदीनुसार लोकसंख्या तीस हजाराच्या जवळपास असली तरी वास्तवातील लोकसंख्येचे गणित जाणकारांचमते पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजारांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. अशा या मोठ्या लोकसंख्येच्या गावात ग्रामीण रुग्णालय, ग्रामविकास विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशन, भुमी अभिलेखा कार्यालय, श्री. गोविंद महाराज मंदिर, श्री. त्रिविक्रम महाराजांचे मंदिर असल्याकारणाने प्रती पंढरपूर म्हणून या गावाची महाराष्ट्रात ओळख आहे.
अश्या या पिंपळगाव हरेश्र्वर गावाजवळून बहुळा नदी वाहते व पिंपळगाव हरेश्र्वर गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बहुधा नदीवर पुल बांधण्यात आलेला आहे. परंतु हा पुल बांधतांना मात्र पुलाचे बांधकाम आहे त्या पुढे पुलाच्या दोघ बाजूला भराव करण्यात आलेला आहे. हा भराव करतांना काळजीपूर्वक काम झाले नसल्याने तसेच मुरुम, मातीचा भराव केल्यानंतर दगडाची पिचींग करणे गरजेचे असतांना संबंधित इंजिनिअर व ठेकेदाराने कमालीचे दुर्लक्ष केले असल्याने पुलाचे काम झाल्याबरोबर टाकलेला भराव वाहून गेल्यामुळे पुलाच्या जवळच भररस्त्यावर मोठा खड्डा पडला असून मागील एक ते दिड वर्षांपासून या खड्ड्याची डागडुगी होत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे व्यवसायीक, शैक्षणिक संस्था, प्रती पंढरपूर अशी ख्याती व ऐतिहासिक देवस्थान, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालये विशेष करुन मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच दैनंदिन कामानिमित्त बाहेर जाणारे व बाहेर गावाहून येणारे प्रवासी तसेच विद्यार्थी संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची व बसेसची वर्दळ सुरू असते म्हणून हा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
तसेच पिंपळगाव हरेश्र्वर गावाला जोडणारा ह्या मुख्य रस्त्यावर पुलाच्या जवळच मोठा खड्डा पडला असून हा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा यासाठी पिंपळगाव हरेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. राजेंद्र भाऊ महाजन यांनी जिल्हापरिषदेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हापरिषदेचे सदस्य यांना वारंवार भेटून अर्जफाटे व तक्रार करुनही आजपर्यंत या बहुळा नदीच्या पुलाजवळ असलेला खड्डा बुजवण्यात आला नसल्याने मा. राजेंद्र महाजन व पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध केला आहे.