सुनजगाव येथील शेतकऱ्यास डॉक्टर सागरदादा गरुड यांनी दिला मदतीचा हात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२०
यावर्षी सगळीकडे पावसाने थैमान घातले होते.याच कालावधीत जामनेर तालुक्यातील सुनजगाव बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी श्री. धोंडु कुंभार यांच्या मालकीच्या शेतात अंदाजे साठ हजार रुपये किमतीची बैलजोडी बांधलेली होती. या बैलजोडीवर विज कोसळून बैलजोडी ठार झाली होती.
या अचानक आलेल्या संकटाने शेतकरी कुटुंब हवालदिल झाले होते. त्यातच शासनाच्या जाचक अटी नियम व नोकरशाहीचा नाकर्तेपणा यामुळे शेतकऱ्याला कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती.म्हणून धोंडु कुंभार हताश झाले होते.
या बाबत डॉक्टर सागरदादा गरुड यांना त्यांच्या कार्यांकडून माहिती मिळताच त्यांनी लगेचच सुनजगाव येथे पिडीत कुंटूबाचे घरी जाऊन १५०००/०० हजार रुपये रोख देऊन आर्थिक मदत केली.
ही मदत अचानकपणे व न मागता मिळाल्याने धोंडु कुंभार याचे मन गहिवरून आले व डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
(धोंडु कुंभार=विज पडुन बैलजोडी गमावल्याने मला खुपच अडणींचा सामना करावा लागला. भविष्यात बैलजोडी घेण्याची माझी ऐपत नव्हती याच विवंचनेत असतांना व माझ्या मनीध्यानी नसतांना डॉक्टर सागरदादा गरुड यांनी देवरुपात येऊन मला जी मदत केली ती लाखमोलाची आहे. असे मत व्यक्त केले. व आभार मानले )
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ साबळे, देवेंद्र पाटील,पप्पू भामरे, माजी पंचायत समिती सदस्य नाना पाटील,विलास भारुडे,सीताराम भामरे, भरत पाटील,राजू पाटील व डॉक्टर सागरदादा गरुड यांचे सहकारी व मित्र परिवार उपस्थित होता.