गेंड्याच्या कातडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला वठणीवर आणण्यासाठी शेंदुर्णीकर आक्रमक.
शेख हमीद.(शेंदुर्णी)
दिनांक~२४/०२/२०२३
एका बाजूला शासनाने “रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे” असे हजारो नव्हे तर लाखो रुपये खर्चून सगळीकडे मोठ, मोठे फलक लाऊन जाहिरातबाजी केली आहे. परंतु शासनाने लावलेले फलक व रस्त्यांची अवस्था पहाता नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
असाच एक रस्ता म्हणजे शेंदुर्णी ते सोयगाव हा रस्ता आहे. हा सात किलोमीटर लांबीचा असून यापैकी तीन किलोमीटर रस्ता हा जामनेर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो व उर्वरित रस्ता मराठवाड्यातील सोयगाव तालुक्याच्या हद्दीत येतो. पैकी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते सोयगाव ह्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्ता हा रेल्वेस्थानक चौफुली पासून ते पाण्याच्या पर्यंतचा संपूर्ण रस्ता हा शेंदुर्णी शहरातून जाणारा रस्ता हा मागील तीन वर्षांपासून अत्यंत खराब झाला असल्याने तसेच शेंदुर्णी ग्रामस्थांनी या रस्त्याचे त्वरित नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी मागील तीन वर्षांपासून लाऊन धरली होती.
या मागणीनुसार जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील पाच वर्षांपासून या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. परंतु पाच वर्षाच्या कालावधी जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीसाठी माती, मुरुम व खडीचे ढीग टाकून अडचण निर्माण करत चालढकल सुरु होती. यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या, येणाऱ्या वाटसरुंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. व याच दरम्यान बरेचसे अपघात होऊन काही वाहनधारकांना शारीरिक इजा झाल्या होत्या व वाहनांची मोडतोड होण्याची मालिका सुरूच होती. ही परिस्थिती पाहून जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभकर्ण झोपेतून जागे करण्यासाठी शेंदुर्णी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करत या रस्त्याचे त्वरित नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी लाऊन धरत रास्तारोको आंदोलन सुरू केले.
शेंदूर्णी नगरीत खुप मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन रास्तारोको करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या आंदोलन सुरु झाल्यावर जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय शाखा अभियंता मा. श्री. आर. डी. पाटील साहेब, या. श्री. चेन्नेवर साहेब, या. श्री. एस व्हि. चौधरी साहेब हे कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन धावतपळत येऊन आंदोलनकर्त्यांना भेटून शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्याचे काम पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करु असे लेखी पत्र लिहून देत आश्वासन दिले.
शेंदूर्णी, सोयगाव रस्त्याच्या नुतनीकरणासाठी आंदोलन करण्यासाठी भाग पाडणाऱ्या जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उशीराने का होईना जाग आली व त्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना व समस्या जाणून घेत रस्ता नुतनीकरणाचे आश्वासन दिले म्हणून आंदोलनकर्त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या आंदोलनात उध्दव बाळासाहेब सेनेचे शेंदुर्णी शहरप्रमुख भैय्या भाऊ गुजर, जेष्ठ शिवसैनिक बारकु जाधव, नितीन गुजर, राजू पाटील, तुकाराम पाटील, भुषण बडगुजर, सुनील बारी, अजय भोई, विलास बारी, नितीन गुजर बहुसंख्य शिवसैनिक तसेच फरीद शेख, हमीद शेख, नगरसेवक शरद बारी, पंडितराव जोहरे, शिवसेना शहरप्रमुख संजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे स्नेहदीप गरुड, जुबेर शेख, शकील शेख, अश्फाक शेख, वैभव पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, निलेश बाविस्कर, अनिल झंवर, आरिफ खान, शेख अब्रार सर, वाहिद अली, राजू गुजर, जाफर शेख, खालिद शेख, शकील शेख, इमरान शेख, सैय्यै निसार, निसार वायरमन, सोहेल शेख, शेख रईस, प्रवीण कापुरे, जमीर पिंजारी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ,
यावेळी पंडितराव जोहरे, फरिद खान, डॉ. निर्मलकुमार अग्रवाल, शिवसेनेचे शहरप्रमुख भैय्या सुर्यवंशी, मोहम्मदिया उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अरबास सर, राहुल पाटील यांनी खराब रस्त्यामुळे वाटसरु व वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र शब्दांत मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनाचे सुत्रसंचलन यांनी केले व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा श्री. प्रतापराव इंगळे साहेब, शेंदुर्णी पोलिस चौकीचे उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मनोज गुजर व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.