पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी यंत्रणा सज्ज
दिलीप जैन. ( पाचोरा )
पाचोरा तालुक्यात ९६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी यंत्रणा सज्ज
पाचोरा— तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींपैकी ९६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्या ९६ ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबरअखेर संपल्याने त्याठिकाणी सद्यस्थिती प्रशासक राज सुरु झाले आहे. उर्वरित ४ ग्रामपंचायतीचे मुदत दोन वर्षे बाकी असून तेथे लोकनियुक्त सरपंच कारभारी आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९६ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आखतवाडे बाळद बु, भोकरी, चिंचखेडे खुर्द, दिघी, डोकंलखेडे, गाळण बु, घुसर्डी बु, गोराडखेडा खुर्द, कळमसरा, खडकदेवळा बु, खाजोळा, कुरंगी, कुर्हाड बु, लोहारा, मोहाडी, मोंढाळा, नगरदेवळा, परधाडे, पिंपळगाव बु, पिंपरी खुर्दप्र पा, सांगवी प्र लो, सारोळा खुर्द ,शहापूरा, वडगाव कडे, वडगाव मुलाने, अटल गव्हाण, चींचपुरे, सावखेडा खुर्द, वाणेगाव, वेरुळी खुर्द, अंतुर्ली खुर्द, अंतुर्ली खु प्र लो, अंतुर्ली खु प्रपा, बांबरुड खुर्द ,भोरटेक खु गोराडखेडा बु, हनुमान वाडी, खडकदेवळा खुर्द, लासुरे, लोहारी बु, लोहटार, म्हसास, नाईक नगर, नेरी,नांद्रा,निंभोरी, निपाने, पिंपळगाव खुर्द प्रभ, लासगाव, सामनेर, सारोळा बु, शेवाळे, टाकळी बु, वडगाव बुप्र पा, वडगाव खुर्द प्रभ, वडगाव खुर्दप्र पा, वाडी, वरखेडी बु, वरसाडे प्र बो,वेरूळी बु, आसनखेडा बुद्रुक, अंतुर्ली बु वर पा, बांबरुड प्र बो ,भातखंडे खुर्द, भोजे, दहिगाव, डोंगरगाव, जारगाव, कासमपुरा, खेडगाव नंदीचे, कुर्हाड खुर्द, लासगाव, नाचणखेडा, ओझर, पिंपरी बुद्रुक प्रभ, पिंपरी बु प्र पा ,पुंनगाव, राजुरी बु ,रामेश्वर, सातगाव ,तारखेडा बु ,तारखेडा खू ,वाघुलखेडा, वरसाडे प्र पा, कोल्हे, बिलदी, बुद्रुक, दुसखेडा ,सारवे बुद्रुक, सावखेडा बुद्रुक, माहिजी, शिंदाड, ह्या ग्रामपंचायती व प्रशासक कारभार करीत असून लवकरच निवडणुका होऊ घातल्या ने प्रशासनाची तयारी सुरू आहे.याचाच भाग म्हणून पाचोरा तहसील कार्यालयात निवडणूक साहित्य ,ईव्हीएम मशीन, मतदार याद्या ,कर्मचारी, याची चाचपणी व अपडेट करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हंणून पाचोरा तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील हे सहकारी कर्मचारी तलाठी यांच्या सहकार्याने ईव्हीएम मशीन अपडेटचे काम करण्यात व्यस्त आहेत.यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल लागल्याचे दिसत आहे.