या जनरल डायरच्या औलादिना, धडा शिकवण्यासाठी एकत्र या (संतोष पाटील)

सत्यजीत न्यूज(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२१
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी या ठिकाणी संविधानिक मार्गाने स्वतःचा न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडून टाकणाऱ्या हराम खोर मस्तवाल माजलेल्या लोकांच्या विरोधात संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे नाही तर ही वेळ आपल्यावर ही आल्याशिवाय राहणार नाही *शेतकरी तितुका मेळवावा* तरच आपण या देशामध्ये टिकू शकतो जगू शकतो नाहीतर आपल्याला आपल्या हक्कांविषयी आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी आंदोलन करणे ही अवघड होऊन जाईल सुमारे शंभर वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती ती घटना म्हणजे *जालिंयावाला बाग हत्याकांड* डायरने अंदाधुंद गोळीबार करून कितीक लोकांना यमसदनी पाठवले होते मात्र तेव्हा आपण पारतंत्र्यात मध्ये होतो आता आपण स्वातंत्र्यात आहोत हा देश येथली कायदा-सुव्यवस्था संपूर्ण लोकशाहीच्या मार्गाने जाणारी आहे मात्र हे इंग्रजांन पेक्षाही वाईट असणारे राज्यकर्ते जनतेवर अन्याय अत्याचार करत आहेत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून या लोकांनी इंग्रजांच्या अर्थात जनरल डायरच्या अवलादी अजून भारतात आहेत हे सिद्ध करून दिलेल आहे या अविचारी लोकांच्या विरोधामध्ये संपूर्ण देश उभा राहिला पाहिजे तरच हा देश टिकेल शेतकरी कामगार कष्टकरी सुखाने जगेल त्यासाठी आपण सर्वजण एकत्र या आणि बघ काय होतं ते पहा या
*बंद मध्ये सामील व्हा*
संतोष पाटील
7666447112