पत्रकर ईश्वर इंगळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईची पत्रकार संघाची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२२
सोयगाव येथील सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी ईश्वर इंगळे यांच्यावर रविवार रोजी एका वाळू माफियाने हल्ला चढवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती. या घटनेची त्वरित सखोल चौकशी होऊ तातडीने संबंधित हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक १८ जूलै सोमवार रोजी सोयगाव तसेच सोयगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन सोयगाव तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. रमेशजी जसवंत साहेब व सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अनमोल केदार साहेब यांना निवेदनाव्दारे मागणी केली असून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
पत्रकारांनी दिलेले निवेदन स्विकारुन घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करुन कायद्याचे काटेकोरपणे पालन करत त्वरित गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक मा. श्री. अनमोल केदार यांनी दिले आहे.
तसेच प्रसारमाध्यम व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांवर असा हल्ला होणे ही खेदजनक व निषेधार्थ बाब असून गौण खनिजांचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करणारांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत या हल्ल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना कळवून लवकरात, लवकर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन सोयगावचे तहसीलदार मा. श्री. रमेशजी जसवंत यांनी दिले आहे.
तसेच पत्रकार ईश्वर इंगळे यांना मारहाण प्रकरणी राजकीय स्तरावरही पडसाद उमटले आहेत. राजकीय लोकप्रतिनिधींनी ही घटना निंदनीय असल्याचे सांगितले असून या घटनेबाबत जिल्हाभरातून तीव्र पडसाद उमटले आहे.