गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे “रामलीला” चे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०९/२०२२

पाचोरा शहरासह तालुक्यातील नावलौकिक असलेली पाचोरा ते जामनेर महामार्गाजवळच सिंधी कॉलनी परिसरात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा ही शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेत वर्ग आहेत. या स्कूलचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूलमध्ये शालेय शिक्षणासोबतच संस्कृती, संस्कार, धार्मिकता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातिय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता अश्या विविध विषयांवर अभ्यास व शिक्षण देणारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे.

याच गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य मा. श्री. प्रेम शामनानी यांचा येत्या ०५ ऑक्टोबर २०२२ बुधवार रोजी वाढदिवस आहे. विशेष म्हणजे याच दिवशी विजयादशमी (दसरा) सण हा उत्सवाचा दिवस आहे. म्हणून हा दुग्धशर्करा योग समजून व आपण या देशाचे नागरिक असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून प्राचार्य मा. श्री. प्रेम शामनानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व दसरा सण त्याच दिवशी असल्याकारणाने “रामलीला” चे आयोजन करुन असत्याचा अंत व सत्याचा जन्म तसेच पापावर पुण्याचा विजय हा संदेश विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा हा दुहेरी हेतू डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रामलीलाचे विविध प्रसंग व दृष्यांच्या माध्यमातून दाखवणार आहेत.

ही रामलीला दाखवण्यासाठी मागील काही दिवसांपासून ३० ते ४० विद्यार्थी सतत सराव करत असून हे विद्यार्थी रामलीलाचे सादरीकरण करणार आहेत. विशेष म्हणजे मागील ४० वर्षांनंतर यावर्षी पहिल्यांदाच रामलीला बघण्याचा सुवर्ण योग गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य मा. श्री. प्रेम शामनानी यांनी दसरा व त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस येत असल्याने पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिला असल्याने हा यावर्षीचा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

म्हणून पाचोरा तालुक्यातील व शहरातील सर्व बंधु व भगिनींनी पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात दसेरा मैदानावर सिंधी नवजवान सेवा मंडळातर्फे आयोजित कुंभकर्ण व रावन दहन तसेच रामलीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आनंद लुटावा असे आवाहन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा चे प्राचार्य मा. श्री. प्रेम शामनानी व सिंधी नवजवान सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या