राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था जळगांव यांचे तर्फे कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. वंदना चौधरी (कळमसरा) यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर

दिलीप जैन. (पाचोरा)
राजनंदिनी बहुउद्देशिय संथा जळगांव यांचे तर्फे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुनीता शेळके (लोहारा) व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना चौधरी (कळमसरा) यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.,
जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असताना सुनीता शेळके यांनी जिल्ह्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि ते यशस्वीपणे राबविले. वरखेडी-कुऱ्हाड गटातील ग्रामविकासावर सर्वाधिक भर दिला. तसेच वंदना चौधरी यांनी कोरोनाच्या कालावधीत पाचोरा व जामनेर तालुक्यातील असंख्य गावांमध्ये जनजाग्रुती केली. ग्रामीण भागातील अनेक क्षेत्रामधील समस्या त्या शासन, प्रशासन स्तरावर मांडून सोडवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. त्या महिलांचे राज्यव्यापी संघटन उल्लेखनीय करीत आहेत. दोघं सन्मानार्थींना लवकरच पुरस्कार वितरण करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी कळविले आहे.