वडगाव जोगे येथे दिपकभाऊ राजपूत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धांचे उदघाटन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथे तरुण मित्र मंडळातर्फे तरुणांमध्ये खेळा विषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथे तरुण मित्र मंडळातर्फे सतिश चव्हाण, कैलास चव्हाण, सुनील राठोड, रवींद्र चव्हाण, वामन राठोड, अनिल जाधव, दिनेश चव्हाण, अंकुश जाधव, योगेश चव्हाण यांनी खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धांमध्ये शहरी व ग्रामीण मिळून एकूण ३२ संघानी सहभाग नोंदवला असून या स्पर्धांचा शुभारंभ दिनांक १६ ऑक्टोबर शनिवार रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकभाऊ राजपूत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. तरुणांमध्ये खेळा विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. दिपकभाऊ राजपूत यांच्यातर्फे प्रथम बक्षीस १५०००/०० रुपये, पंचायत समिती सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांच्यातर्फे व्दितीय बक्षीस ९०००/०० रुपये व सरपंच कमलबाई शळके यांच्या तर्फे विनायकराव शळके यांनी तृतीय बक्षिसासाठी ५०००/०० प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले आहे.
या कबड्डी स्पर्धांचे शुभारंभ प्रसंगी मा.श्री. काशिनाथ चव्हाण, आत्माराम चव्हाण, धनराज चव्हाण, नवल चव्हाण, हिंमत चव्हाण, सुनील जाधव, डॉ. शामकांत पाटील, युवराज चव्हाण, एकनाथ राठोड, सुदाम चव्हाण, नामदेव चव्हाण इतर मान्यवर व खेळाडू उपस्थितीत होते.