यावर्षीचा अंबिका देवीच्या काकडा आरतीचा मान स.पो.निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०३/२०२२
अंबे वडगाव येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री. अंबिका देवीचा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे यात्रा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. आता कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे या वर्षी श्री. अंबिका देवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अंबिका देवीच्या मंदिरात काल दुपारी ठीक बारा वाजता काकडा आरती करण्यात आली. यावर्षीच्या काकडा आरतीचा मान पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांना देण्यात आला होता. यानिमित्ताने मा.श्री. महेंद्रजी वाघमारे यांच्या हस्ते श्री. अंबिका मातेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करत काकड आरती करण्यात आली. यावेळी आंबे वडगाव येथील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
याप्रसंगी अंबे वडगाव ग्रामस्थ व अंबिका देवी यात्रोत्सव पंच मंडळाच्या वतीने कायदेतज्ज्ञ मा.श्री. मंगेशराव गायकवाड, मा.श्री. विनायकराव शळके यांच्या हस्ते मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजीत पाटील, अंबे वडगावचे ग्रामस्थ व पंच मा.श्री. संजय पाटील, सोपान देवरे, समाधान गायकवाड, अमोल पाटील, विरभान पाटील, योगेश शिंदे, दिवाकर वाघ, मुकेश पाट, मिलिंद भुसारे, तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर सपकाळे, प्रदिप सानप, सुनील निकम व हजारो भाविक भक्त, माता, भगिनी उपस्थिती होते.
*************************************
*माझा गाव आता*
*गाव होत चालला आहे*
*जून्या बुरसटलेल्या विचारांना दूर सारत*
*गाव विकासाच्या दिशेनं चालला आहे*
—————————————
*चिरेबंद वाड्यात गुदमरुन पडलेला प्रकाश*
*आता गोरगरिबांच्या अंगणात*
*खेळाया लागला आहे*
*होय माझा गाव*
*आता गाव होत चालला आहे*
————————————-
*पोटापाण्यासाठी दुर उडालेली पाखरं*
*घरट्याकडे परत फिरू लागली आहे*
*गाव पांढरीत आता कणसा कणसात*
*दाणा भरू लागला आहे*
————————————-
*आई भवानीच्या परडीतलं*
*अन्न खाल्लेला माणूस*
*आता खऱ्या अर्थाने माणूस होत चालला आहे*
*माझा गाव आता गाव होत चालला आहे*
———————-,——————
संतोष पाटील
७६६६४४७११२