शेतकऱ्यांचा विद्यूतपुरवठा त्वरित जोडून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक विकास पाटील यांचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक११/०५/२०२१
शेतकऱ्यांना त्वरित विद्यूतजोडणी करुन द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत राष्ट्रवादीचे गटनेते मा.श्री.संजय वाघ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विद्यमान नगरसेवक मा.श्री. विकास पाटील सर यांनी विद्यूतवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केल्यामुळे एका बाजूला कष्टकरी शेतकरी उन्हात जळत असतांना दुसरीकडे भक्कम पगार घेऊन फुकटची विज वापरून वातानुकूलित कार्यालयात कुंभकर्ण झोप घेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडाली.
(नादुरुस्त फुटलेले कटाऊट,फुजतार न वापरता विद्यूतवाहीणीचे तरांचा वापर )
मे महिन्याच्या कडकडीत उन्हात सततच्या लॉकडाऊचा सामना करत शेतकरीवर्गने हाडाचे पाणी करुन आपल्या शेतातील विहिरीत आहे त्या पाण्याच्या भरवशावर आपल्याला ऐपतीप्रमाणे ज्वारी,दादर,मका, बाजरी व आताच्या परिस्थितीत टरबूज व थोड्याफार प्रमाणात भाजीपाला ही पिके घेत आहेत. परंतु शेतकऱ्यांना मिळणारा विद्यूतपुरवठा हा नियमितपणे होत नाही. कधी दिवसा तर कधी रात्री विद्यूतपुरवठा सुरु होतो मात्र तोही कमी दाबाने असतो या कारणामुळे पिकांना पाणी देणे कठीण जाते तरीही शेतकरी रात्रीचा दिवस करुन विंचू,काटे,जंगली श्वापदांचा सामना करत झटत असतो.
(नादुरुस्त व सतत सताड उघडे बॉक्स लहान मुले व जनावरांसाठी घातक आहेत.)
तसेच काही शेतकऱ्यांनी आता शेतीची नांगरटी,टिलर करुन कचरावेचून जमिनीचे सपाटीकरण करुन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठिबकद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिबकच्या नळ्या शेतात अंथरल्या आहेत.परंतु याच कालावधीत विद्यूतवितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वेळेवर विद्यूतपुरवठा दिला जात नाही. त्यांच्यामागे वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला जातो.वीजबिल न भरल्यास शेतीपंपाचा विद्यूतपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या हाती येणारे पिक पाण्याअभावी नष्ट होते यात शेतकऱ्यांचा बियाणे खर्च, मेहनत वाया जाते.अश्या अनेक अडीअडचणी घेऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार मा.श्री.दिलीपभाऊ वाघ यांची भेट घेऊन विद्यूतवितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार केली.
(विद्यूतवितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी हे हप्ते घेऊन विद्यूतचोरांना अभय देतात व यातून लाखोंची कमाई करतात मात्र या गैरप्रकाराने विद्युतग्राहकांना सुरळीतपणे विद्यूतपुरवठा मिळत नाही.)
याची दखल घेत दिलीपभाऊ वाघ यांनी राष्ट्रवादीचे गटनेते मा.श्री.संजय वाघ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विद्यमान नगरसेवक मा.श्री. विकास पाटील सर यांच्याकडे शेतकऱ्यांना त्वरित विद्यूतजोडणी मिळवून देण्यासाठी कामगिरी सोपवली. यांनी त्वरित विद्यूतवितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन विद्यूतवितरण कंपनीचे वरिष्ठ अभियंता श्री.चव्हाण यांची भेट घेऊन शेतकरी बांधवांच्या समस्या बाबत सविस्तर चर्चा केली.
या चर्चेत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करणे,विज बिल भरलेले असल्यावरही शेतकऱ्यांना त्रास देने,थोडाही तांत्रिक बिघाड झाल्यावर तो दुरुस्त करुन देण्यासाठी कर्मचारी वर्गाकडून पैशाची मागणी करुन शेतकऱ्यांची अडवणूक करणे,विद्यूतपुरवठा करतांना त्यात नियमितता नसणे,कमी दाबाने विद्यूतपुरवठा होत असल्याने विद्यूतपंप जळणे,विद्यूतवितरण खंडित झाल्यावर त्वरित दुरुस्ती न करणे अश्या अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच विद्यूतवितरण कंपनीचा एकही कर्मचारी मुख्यालयाचे गावात रहात नसल्याने विद्यूतपुरवठा खंडित झाल्यावर तो सुरळीत होण्यासाठी लाईनमन व विद्यूतसहाय्यक यांची तासंतास वाट पहावी लागते किंवा झीरो वायरमनला पैसे देऊन काम करुन घ्यावे लागते तरी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे गावी रहाण्यासाठी सक्ती करावी,ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती,विद्यूत डीपी मध्ये कटआऊट बसवणे,पावसाळ्याआधी विद्यूतवाहीण्या दुरुस्ती करुन ट्री कटींग करणे अश्या अनेक समस्या सांगून शेतकऱ्यांच्या अडचणी त्वरित सोडवण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना सुरळीतपणे विद्यूतपुरवठा द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास विद्यूतवितरण कंपनीच जबाबदार राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते डांबूर्णी चे सरपंच मा.श्री.संतोष परदेशी युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, प्रा.प्रदीप वाघ, प्रा.नितीन पाटील,प्रशांत धनगर,संदीप महालपुरे, मयुर पाटील,संतोष महाजन, प्रा.देविदास सावळे,गौरव पाटील,जनार्धन पाटील, बाबाजी ठाकरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.