कळमसरा येथे अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांकडून सामूहिक अत्याचार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दिनांक १४ मे २०२२ शनिवार रोजी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पंचक्रोशीतील गावातून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली जात आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १३ मे रोजी रात्री ९ वाजता गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून गावातील २० ते २५ दुचाकी घेऊन तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला.
मात्र संबंधित मुलगी गावात किंवा मैत्रीणी कडे आढळून न आल्यामुळे कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. तरीही मुलगी आढळून आली नाही. गावातील व परिसरातील शोधाशोध संपल्यानंतर मुलीचे कुटूंबीय चिंताग्रस्त झाले होते. मुलगी सापडली नाही म्हणून उद्या सकाळी शोध घेऊ असे ठरवून सगळे आपापल्या घरी निघून गेल्याने वातावरण शांत होते.
चिंताग्रस्त मुलीचे कुटुंबातील सदस्य आमची मुलगी सुखरुप घरी यावी यासाठी देवाचे नामस्मरण करत देवाला नवस कबुल करत देवाच्या भरवशावर रात्रभर जागून काढली. असे करत करत शनिवारची पहाट झाली. अश्यातच रात्री घरातून गायब झालेली मुलगी सकाळी अंदाजे तीन वाजेच्या सुमारास अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये घरी पोहचल्यानंतर तीच्या आईवडिलांनी तिची झालेली अवस्था पाहून विश्वासात घेत तु रात्री कुठे होतीस व नेमके काय घडल अशी विचारणा केली.
असे विचारताच पिडीत मुलीने हंबरडा फोडला रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली यावेळी तिने सांगितले की मला मला ५ ते ६ मुलांनी अचानकपणे उचलून नेत शेतात घेऊन गेले व तेथे त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी देत माझ्यावर जोर, जबरदस्तीने अत्याचार केले व ही हकीकत कुणालाही सांगीतल्यास याद राख अशी धमकी देत सकाळी, सकाळी तिन विजेच्या सुमारास त्यांनी मला महिलांच्या शौचालयाजवळ सोडून ते पळून गेले.
ही हकीकत ऐकून कुटुंबातील सदस्यांची मानसिकता खालावली व रडत, रडत झालेली घटना गावातील समंजस लोकांना सांगितली व पिडीत मुलीला उपचाराची गरज असल्याकारणाने तीला उपचारासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार ही खबर पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. खबर दिल्यानंतर पोलिसांनी मुलींची भेट घेऊन जबाब लिहून घेत पुढील तपास सुरू केला आहे.
पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी गावातीलच पाच संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध, बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम प्रमाणे दिनांक १४ २०२२ शनिवार रोजी दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उप अधीक्षक मा. श्री. कैलास गावंडे व पाचोराचे डी. वाय. एस. पी. यांनी कळमसरा गावात भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांना योग्य त्या सुचना दिल्या या सुचनेनुसार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी कारवाई करत ९ संशयित ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी १) प्रमोद उर्फ पप्पु संजय चौधरी, वय-२२ वर्ष, २) मंगेश संभाजी चौधरी वय-२२ वर्ष, ३) ज्ञानेश्वर सुरेश उशीर, वय १९ वर्ष ४) योगेश उर्फ मयूर संभाजी चौधरी, वय २४ वर्ष, ५) कैलास शिवाजी चौधरी, वय ३२ वर्ष ६) भावेश उर्फ भैय्या सुनिल बाघ वय-१९ वर्षे, इमरान राजू पिंजारी वय १३ व इतर ३ अशा एकूण ९ आरोपींना सदर गुन्हयात अटक केली असून पुढील तपास अतिरिक्त पोलिस उप अधीक्षक मा. श्री. कैलास गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.