बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा पाचोरा येथे ब्राह्मण समाजातर्फे तीव्र निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०४/२०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथील एका जाहीर सभेत ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करून ब्राह्मण समाजाच्या पूजा-अर्चा व विधीचे संदर्भात खिल्ली उडवली व अपप्रचार केल्यामुळे तमाम ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने पाचोरा येथे काल रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे व पोलीस निरीक्षक मा. श्री. किसनराव नजन पाटील यांना अमोल मिटकरी यांच्या वर कारवाई करण्यासंदर्भात व निषेध व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले.
यावेळी ब्राह्मण सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲड सचिन देशपांडे, ॲड चंद्रकांत शर्मा, खुशाल पाटील, प्रसाद डोलारे, ,उदय जोशी, अमोल पांडे, योगेश देशपांडे, महावीर गौड, राम शर्मा, चंद्रकांत जोशी, सुनील मोघे, गजानन जोशी, हेमंत ओझा, वैभव जोशी, संदीप सराफ, विनोद शर्मा, संदीप केळकर, सचिन देशपांडे, आशिष शर्मा, समाधान जोशी, सागर तांबोळी, हेमंत जोशी, प्रदीप कौण्डिन्य, मिलिंद जोशी, यासह पुरोहित संघाचे व संस्थेचे सभासद उपस्थित होते.