निवडणुकीतील पराभव जिव्हारी; परधाडेत प्रतिस्पर्ध्याला मारहाण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२१
आधीचे राजकारण समाजकारण करण्यासाठी होते व समाजातील तळागाळातील घटकांच्या उन्नतीसाठी राजकारण केले जायचे परंतु आता स्वताचे चांगभले करून घेण्यासाठी राजकारण खेळले जात असल्याचे दिसून येते.
असाच काही अनुभव पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आला.
आज झालेल्या मतमोजणीत पराभव झाल्याचे जिव्हारी लागून पंचायत समितीच्या माजी उपसभापतीने विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांच्या दुचाकींना टक्कर देऊन त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला आहे.
याबाबत वृत्त असे की, परधाडे ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले तथा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात पॅनल उभे केले होते. आज जाहिर झालेल्या निकालात बन्सीलाल पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाला. हा पराभव त्यांना चांगलाच जिव्हारी आला. मतमोजणी स्थळावरुन घरी परत येत असतांना त्यांनी आपल्या स्कॉर्पीयो (क्रं. एम. एच. १९ सी. यु. ६९९० या चारचाकीने समोरुन मोटरसायकलवर येत असलेल्या सोपान शंकर सोनवणे यास जोरदार धडक दिली.यात सोपान सोनवणे गंभीर जखमी झाले.
बन्सीलाल पाटील एवढ्यावरच न थांबता गावात सुरू असलेल्या प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार उषाबाई विश्वनाथ पाटील यांच्या मिरवणुकीत सहभागी असलेले राहुल भगवान सोनवणे, रविंद्र भिका सोनवणे, विकास विठ्ठल सोनवणे या कार्यकर्त्यांना मारहाण केली. पराभुत उमेदवारासह महिलांनी रुपाली विठ्ठल सोनवणे, सुमित्रा विठ्ठल सोनवणे, योगिता राहुल सोनवणे, आरती सोपान सोनवणे, यशोदा भगवान सोनवणे यांना त्यांचे घरात जावुन मारहाण केल्याने पाचोरा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात काम सुरू होते.