पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची वॉश आऊट मोहीम सुरु, शिंदाड परिसरातील दारु निर्मिती अड्डा उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अवैधधंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम सुरु केल्याने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले असून सुज्ञनागरीक व महिलावर्गातून पोलिसांनी सुरु केलेल्या धाडसत्राबाबत धन्यवाद देत अशीच कारवाई सुरु ठेऊन गावागावात सुरु असलेला सट्टा, जुगार, गावठी व देशीदारुची विक्री कायमस्वरूपी बंद करून सर्वसामान्य व गोरगरीबांच्या संसाराची होणारी धूळधाण थांबवावी अशी आशा व्यक्त केली आहे.
काल दिनांक १५ एप्रिल गुरुवारी पिंपळगाव हरेश्वरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे. यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री. रणजित दादा राजपूत, पै.कॉ. अरुण राजपूत यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिंदाड येथून जवळच असलेल्या सार्वे पिंप्री धरणाच्या परिसरातील गावठीदारु निर्मीतीच्या अड्यावर धाड टाकून अंदाजे २४०००/०० किंमतीचे गुळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन असलेले २०० लिटर क्षमतेचे सहा प्लास्टिक ड्रम, त्यात गुळव नवसागर मिश्रित कच्चे रसायन असलेले सहा प्लास्टिकचे ड्रम प्रत्येकी २०० लिटर रसायन अंदाजे १२००.०० लिटर, ४०००/०० रुपये किमतीचे एक २०० लिटर क्षमतेच्या पत्री ड्रम मध्ये अंदाजे १८० लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे गुळ व नवसागर मिश्रित पक्के रसायन, अंदाजे १२५०/०० रुपये किमतीची तीस लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु असा ३०,६५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदिप बजरंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून शिंदाड येथील आरोपी अनिल मासुम तडवी वय (२६) व भुरा शरीफ तडवी वय (२५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.