पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला उद्या मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या शुभहस्ते क्रिडापयोगी साहित्याचे अनावरण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०५/२०२२
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांच्या संकल्पनेतून व जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. प्रविणजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जळगाव जिल्हा पोलीस निधीतून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे आवारात ओपन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट व इतर क्रिडापयोगी इतर साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या क्रिडापयोगी साहित्याचे अनावरण उद्या दिनांक १३ मे २०२२ शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रविणजी मुंडे साहेब यांच्या हस्ते व अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. रमेश जी चोपडे तसेच डी. वाय. एस. पी. मा. श्री. भरतजी काकडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी पिंपळगाव हरेश्र्वर तसेच पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामस्थ, तरुण मुले, पत्रकार यांनी या क्रिडा साहित्य अनावरण सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी केले आहे.
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उभारण्यात आलेले ओपन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, क्रिकेट साहित्य व इतर क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्यामुळे दिवसभर कामाच्या ताणतणावामुळे थकून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मरगळ झटकण्यासाठी तसेच सकाळी व्यायाम करण्याच्या हेतूने तसेच पोलीस व सैन्यभरतीचा सराव करणाऱ्या व शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे क्रीडा साहित्य महत्वाचे ठरणार आहे. कारण पिंपळगाव हरेश्र्वर हा परिसर ग्रामीण भागात मोडला जात असून या गावपरिसारात शेतकरी कुटुंबातील मुले, मुली अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. यांना स्वतंत्र व स्वखर्चाने व्यायामासाठी जिम लावणे शक्य नाही ही सुविधा तालुका किंवा जिल्हास्तरावर असल्याने खर्च पेलवण्यासारखा नसल्याने होतकरू तरुण व्यायामापासून वंचित रहात होती. परंतु आता पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला सर्वप्रकारचे क्रीडा साहित्य व जिम उपलब्ध झाल्यामुळे तरुणाई मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हे क्रीडा साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक व पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांचे आभार मानले आहेत.
हे क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक, सर्व पोलीस अंमलदार, सर्व कर्मचारी वृंद तसेच पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
(पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला सर्वधर्मसमभाव व एकोपा निर्माण व्हावा म्हणून सर्वधर्मीय क्रिकेट व इतर स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या व विजयी झालेल्या खेळाडुंना जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रविणजी मुंडे साहेब व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.ष)