सार्वे (जामने) येथे हरिनाम किर्तन व भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या सार्वे (जामने) येथे वरखेडी येथील अखिल वारकरी सेवा महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री.ह.भ.प.कौतिकजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व जामनेर येथील श्री.पंचदशनाम जुना आखाडाचे संस्थापक अध्यक्ष कानिफनाथ महंत धर्मानंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन अखंड हरिनाम संकिर्तन व श्रीमद भागवत कथा सप्ताह संपन्न होणार आहे.
या सप्ताहात दिनांक १७ एप्रिल २०२२ रविवार ते २४ एप्रिल २०२२ रविवार या कालावधीत संपन्न होणार असून यात अनुक्रमे ह.भ.प.संदीप महाराज.(वाघळीकर), ह.भ.प.सुनील महाराज.(कर्किकर), ह.भ.प.तुकाराम महाराज.(मेहुणकर), ह.भ.प.रवींद्र महाराज.(तारखेडेकर), ह.भ.प.वर्षाताई महाराज.(चाळीसगावकर), ह.भ.प.श्वेताताई महाराज.(सार्वेकर), ह.भ.प.राजु महाराज.(केकतनिंभोरेकर), ह.भ.प.गजानन महाराज सोनटक्के.(नांदेडकर) यांचे जाहीर किर्तन रात्री ०९ ते ११ वाजेपर्यंत होणार आहे. म्हणून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वे (जामने) येथील ग्रामस्थांनी केले आहे.
या हरिनाम किर्तन सप्ताहासाठी अंबे वडगाव तांडा नंबर एक येथील सेवानिवृत्त लेखाधिकारी व जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव आंबे चे अध्यक्ष काका श्री व भावी जिल्हापरिषद सदस्य म्हणून जनमानसात चर्चेत असलेले मा.श्री. अरुण बाबुराव पवार व सार्वे, जामने गावचे माजी पोलिस पाटील फकीरा त्रंबक पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पाचोरा भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. अरुण पाटील, वरखेडी गावचे उपसरपंच डॉ. मा.श्री. धनराज पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री मा.श्री. गिरीश भाऊ महाजन, पाचोराचे भाजपा तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल भाऊ शिंदे, भाजपा स्वीय सहाय्यक मा.श्री. गणेश भाऊ गोसावी, कुऱ्हाड गटाचे गटनेते मा.श्री. शरद सोनार भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मा.श्री. मुकेश पाटील, भाजपा कुऱ्हाड, वरखेडी गणप्रमुख मा.श्री. जगदीश भाऊ तेली, भाजपा प.स.सदस्य वरखेडीचे मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार हे उपस्थित राहणार आहेत.
या हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी सहा ते सात वाजता काकडा आरती, सकाळी साडेआठ ते साडेअकरा तसेच दुपारी दोन ते साडेचार यावेळात भागवत कथा, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत किर्तन असा नित्यनेमाने कार्यक्रम होणार असून भाविक, भक्तांनी वेळेवर हजर राहून या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सार्वे ग्रामस्थ व आयोजकांनी केले आहे.
विशेष सहकार्य~
या हरिनाम किर्तन सप्ताहात दिंनांक १७ एप्रिल ते २४ एप्रिल पावेतो तुळशीराम पोसणे, हेमराज पाटील, सार्वे महिला मंडळ, प्रभाकर दुधे, संतोष भिंगारे, समस्त सार्वे महिला मंडळ, भागवत कोळी, प्रकाश दुधे, संदिप पोसणे, ईश्वर बोरसे, सुरेश दुधे हे अन्नदान करणार असून भास्कर थाटे हे जलसेवा पुरवणार आहेत.