गोंदेगाव येथे किराणा दूकान व गॅरेजला भिषण आग, लाखो रुपयांच्या किराणा मालासह मोटरसायकल गॅरेज जळुन खाक.

प्रज्वल चव्हाण(गोंदेगाव)
दिनांक~१०/०३/२०२१
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील किराणा दुकान व मोटरसायकल गॅरेज शॉर्टसर्किटमुळे जळाले असेल असा संशय आहे. दिनांक ९/३/२०२१ मंगळवार रोजी श्री. दिपक लोटन पाखले. यांचे किराणा दुकान व श्री मंगलसिंग त्रंबक राजपुत यांच्या मोटरसायकल गॅरेजला रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागलेली दिसून आली व ती आग इतकी प्रचंड होती की ती आग आटोक्यात आणणं अवघड होतं म्हणून.अग्निशामक दलाचे पथक पाचोरा येथुन बोलवण्यात आले.
अग्निशामन दलाची गाडी रात्री पावणे तीनच्या सुमारास येऊन आग आटोक्यात आणली त्यानंतर किराणा दुकानात, डी. फ्रीज,साधे,फ्रिज किराणा वस्तू असे अनेक वस्तू जळून खाक झालेली आहेत त्याच्या बाजूला असलेले मोटर सायकल गॅरेज मधिल दोन ते तीन मोटरसायकली जळाले आहेत. त्यानंतर स्पेअर पार्ट व मोटरसायकलचे टायर ट्यूब व दुरुस्तीचे संपूर्ण सामान दोघही दुकानाचे सामान जळून खाक झाले, एवढेच नव्हे तर मोटरसायकल यांचे मॅकविल यांचेही पाणी झाले तलाठी व पोलिस पंचनामा नुसार जवळपास ३ लाखाच नुकसान झालेलं आहे. इलेक्ट्रिसिटीच्या शॉर्टसर्किटमुळे झालेले असावे असा अंदाज तलाठी पोलीस पंचनामा करतांना सांगण्यात आले, व त्यांना उदरनिर्वाहासाठी एवढेच एक साधन होते, शासनाकडून योग्य ती मदत मिळावी असे श्री दिपक लोटन पाखले यांचे नुकसान १ लाख रु झालेला आहे. श्री मंगलसिंग त्र्यंबक राजपूत यांचे नुकसान २ लाखाच्या आसपास झालेलं आहे. तरी नुकसान भरपाई मिळावी असे श्री दिपक लोटन पाखले व श्री मंगलसिंग त्र्यंबक राजपूत यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच आजी-माजी सरपंच व गावकरी हे सर्वच उपस्थित होते.