सावता ने केला मळा, विठ्ठल देखीयेला डोळा* म्हणत कुऱ्हाड येथे सावता महाराज पुण्यतिथी साजरी.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२७/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे आज सावता महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. वारकरी संप्रदायातील पहिले आदर्श तसेच मराठीतील पहिले शेतकरी कवी श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी कुर्हाड येथे दरवर्षी साजरी करण्यात येते. आज देखील पुण्यतिथीनिमित्त दुपारी येथील माळी समाज मंगल कार्यालयातील संत सावता महाराज यांच्या मंदिरात मान्यवरांनी पूजाअर्चा करून त्यांचा पालखी सोहळा दुपारी गावातून भजनी मंडळाच्या गजरात वाजत-गाजत काढण्यात आला.
या पालखी सोहळ्यात गावातील महिला मंडळ यांनीदेखील सहभाग घेतला होता. त्यानंतर संध्याकाळी चार वाजेपासून येथील मंगल कार्यालय त महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला .यावेळी सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वितेकरिता कुऱ्हाड माळी समाज अध्यक्ष सुधाकर महाजन, उपाध्यक्ष दिगंबर चौधरी, मा.जिल्हा परिषद सदस्य संतोष चौधरी, डॉ. प्रदीप महाजन, विष्णु माळी, समाधान चौधरी, किरण माळी,सचिन माळी , प्रदीप (आबा) महाजन विजय माळी,आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.