पाचोरा येथील सुमित किशोर आप्पा पाटील आयेजीत दांडिया रास २०२२ पहिल्याच दिवशी जल्लोषपूर्ण व उत्साहात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०९/२०२२
पाचोरा येथील मानसिंगाग्राउंड वर पाचोराचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र श्री सुमित किशोर पाटील तसेच पाचोऱ्याचे उद्योगपती व इंजिनियर श्री. मुकुंद अण्णा बिल्धीकर व उत्कृष्ट दर्जेदार बांधकाम व्यवसायिक श्री. मनोज शांताराम पाटील या त्रिमूर्ती मित्रांनी पाचोरा शहरात महिला वर्ग व तरुण वर्ग करता दांडिया रास डिस्को दांडिया हा कार्यक्रम आयोजित करून सर्व शहरवाशांची मन जिंकून पहिल्याच दिवशी दांडिया रास मध्ये रंग भरला असून अति उत्साहाने जल्लोषपूर्ण उत्साहाने महिला वर्ग तरुण वर्गाने भाग घेऊन आनंद व्यक्त केला.
तसेच यावेळी श्री. मनोज शांताराम पाटील यांच्यातर्फे महिला वर्गाकरिता पैठणी व काही विशिष्ट वस्तू प्रेक्षकांना देण्यात आल्या आजची सुरुवात जय मातादी दुर्गा देवी, आरतीने झाली यावेळी पाचोरा शहरात अनेक मान्यवर उपस्थित होते_आमदार श्री. किशोर आप्पा पाटील श्री. मुकुंद अण्णा श्री. मनोज शांताराम पाटील श्री. सुमित किशोर पाटील तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची धुरा प्राध्यापक सी. एन. चौधरी सर यांनी सांभाळली होती.